

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : रायगड जिल्हाधिकारी पदावरून नुकत्याच बदली झालेल्या निधी चौधरी यांच्याकडे आता शासनाने मुंबई उपनगर जिल्हाधिकारी पदाची सूत्रे दिली आहेत.
मिलिंद बोरीकर यांच्याकडे यापूर्वी ही सूत्रे होती. त्यांची आता महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या संचालक पदी बदली करण्यात आली आहे. तर डॉ. निरुपमा डांगे यांना महाराष्ट्र सदनाच्या सहायक निवासी आयुक्त पदी पाठविण्यात आले आहे.
महाराष्ट्र माहिती आणि तंत्रज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांची बदली महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी करण्यात आली आहे.