धनंजय मुंडे यांच्याकडून मला धोका : करुणा मुंडे

karuna Munde
karuna Munde

मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्याकडून माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या जीवितास धोका असल्याचा आरोप शिवशक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत केला.

धनंजय मुंडे मला आणि माझ्या मुलांना अपघात घडवून मारतील. माझे घर बीडमध्ये आहे. तेथे राहायला गेल्यावरही मला व मुलांना धोका आहे. माझे काही बरेवाईट झाल्यास धनंजय मुंडे जबाबदार असतील, असे करुणा मुंडे म्हणाल्या. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत त्यांनी मत व्यक्त केले. कोणत्याही महिलेवर होणार्‍या अन्यायाबाबत आवाज उठवताना माध्यमांनी वा महिला संघटनांनी दुजाभाव करू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news