दहावीच्या हॉल तिकीटावर वेळापत्रकात चुका!

दहावीच्या हॉल तिकीटावर वेळापत्रकात चुका!

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा वेळापत्रक समजावे यासाठी हॉल तिकीटावर पेपर आणि वेळ याची माहिती दिली जाते, मात्र राज्य मंडळाकडून हॉल तिकीट देताना चुका केल्या आहेत. मराठी माध्यमात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर हिंदी आणि इंग्रजी विषयांच्या पेपरचा क्रम चुकला असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे.

येत्या २ मार्चपासून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा सुरु होत आहे, २५ मार्चपर्यंत परीक्षा
असणार आहे. याचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना सोमवारपासून मिळण्यास सुरुवात झाली आहे. हॉल तिकीट विद्यार्थ्यांना वाटप करताना अनेक विषयांचा क्रम बदलल्याचे शिक्षकांना आढळले आहे.

मूळ वेळापत्रकाप्रमाणे इंग्रजी विषयाचा पेपर ६ मार्च रोजी आहे तर हिंदी विषयाचा पेपर ८ मार्च रोजी आहे. मराठी माध्यमाच्या परीक्षांच्या क्रमानुसार मराठीनंतर हिंदी व इंग्रजीचा पेपर असतो. मात्र हॉल तिकिटावर इंग्रजीचा ८ तारखेचा पेपर आधी आणि इंग्रजीचा ६ तारखेचा पेपर त्यानंतर असा क्रम छापण्यात आला आहे. पेपर कधी आहे या तारखा चुकल्या नसल्या तरी विषयांचा क्रम चुकल्याने गोंधळ आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक संतप्त झाले आहेत. सुधारित सेवांतंर्गत आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुन्हा लागू करण्यात यावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी २ फेब्रुवारीपासून विद्यापीठांतर्गत येणाऱ्या परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे. या बहिष्कार आंदोलनाचा फटका पदवी महाविद्यालयांशी संलग्नित कनिष्ठ महाविद्यालयांना देखील बसला असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांअभावी बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यास महाविद्यालयांना अडचणी येत आहेत. मुंबईतील रुईया, भवन्स चौपाटी, साठ्ये, बीएनएन कॉलेज भिवंडी आदी महाविद्यालयांनी प्रात्यक्षिक परीक्षेच्या आयोजनात येणाऱ्या अडचणींविषयी मुंबई विभागीय शिक्षण मंडळाला पत्र पाठविले आहे.

बारावी परीक्षावर संपाचे सावट !

 कनिष्ठ महाविद्यालयांनादेखील बसला असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांअभावी बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यास महाविद्यालयांना अडचणी येत आहेत. यामुळे बारावीच्या लेखी परीक्षांवरदेखील संपाचे सावट घोंघावत आहे. राज्य सरकारने शिक्षकेतर कर्मचार्यांच्या मागण्या मान्य न केल्यास २० फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय संपात सहभागी झालेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी घेतला आहे. हे आंदोलन पुढे सुरूच राहिल्यास २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या लेखी परीक्षांना या संपाची झळ बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news