file photo
file photo

मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा अटकेत

Published on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  रक्षातून प्रवास करताना सहप्रवाशांकडून मुंबई शहरात दहशतवादी हल्ला होणार असल्याचा मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला कॉल करुन पळून गेलेल्या एका रेकॉर्डवरील आरोपीस बोरिवली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. सुरज
धर्मा जाधव असे या ३२ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याने यापूर्वीही बॉम्बस्फोटासह दहशतवादी हल्ला होणार असल्याचे कॉल केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

त्याच्याविरुद्ध अशाच चार विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांनी सागितले. सोमवारी सायंकाळी सात वाजता सुरजने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला कॉल केला होता. यावेळी त्याने बोरिवली रेल्वे स्थानकातून एक रिक्षा पकडली होती, या रिक्षात इतर दोन प्रवासी बसले होते. ते रिक्षात मुंबई शहरात हल्ला करण्याची चर्चा करीत होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news