डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम येत्या दीड वर्षात पूर्ण होणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम येत्या दीड वर्षात पूर्ण होणार
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भव्य स्मारकाचे काम प्रगतिपथावर आहे. या स्मारकाचे काम मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

इंदू मिल परिसरात उभारण्यात येणार्‍या या स्मारकाच्या कामाची बुधवारी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. त्यानंतर सामाजिक न्याय, एमएमआरडीए आणि महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यांनी स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला. डॉ. आंबेडकर यांच्या नावलौकिकाला साजेसे असे हे स्मारक असेल, असे त्यांनी सांगितले. 4.8 हेक्टर क्षेत्रफळ जागेवर हे स्मारक साकारत आहे. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 1 हजार 90 कोटी रुपये आहे. प्रकल्पाचे प्रवेशद्वार, इमारत, व्याख्यान वर्ग, ग्रंथालय, बेसमेंटमधील वाहनतळाचे 50 टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे.

या स्मारकात डॉ. आंबेडकर यांचा भव्य पुतळा, त्याशिवाय सुसज्ज वाचनालय, पार्किंग, बसण्याची व्यवस्था, मोठे सुसज्ज सभागृह तयार करण्यात येणार आहे. कामाला अधिक गती देऊन निर्धारित केलेल्या वेळेत स्मारकाचे काम पूर्ण करा, अशा सूचना देतानाच डॉ. आंबेडकर यांच्या 25 फूट उंच असलेल्या पुतळा प्रतिकृतीस लवकरच मान्यता देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्मारक असे असेल…

पुतळ्याची उंची – पादपीठ 30 मीटर (100 फूट) उंच व पुतळा 106.68 मीटर (350 फूट) उंच अशी एकूण 136.38 मीटर (450 फूट) उंची असेल. प्रवेशद्वार इमारतीमध्ये माहिती केंद्र, तिकीट घर, लॉकर रूम, प्रसाधनगृह, सुरक्षा काऊंटर, स्मरणिका कक्ष, उपहारगृह व नियंत्रण कक्ष. तसेच बांधकामाचे एकूण क्षेत्रफळ – 46 हजार 388 चौ.मी. हरित जागेचे क्षेत्र 68.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news