कोण देतोय मुंबईला सारख्या धमक्या?

कोण देतोय मुंबईला सारख्या धमक्या?

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : यावर्षीच्या आठ महिन्यांत सात वेळा मुंबईवर दहशतवादी हल्ला चढवण्याच्या धमक्यांचे फोन आणि मेसेजेस आले. महिन्याला एक असे सरासरी प्रमाण आहे. मुंबईची सुरक्षा यंत्रणा चोवीस तास सतर्क असते. तरीही अशी काही धमकी आली की, हायअलर्ट जारी केला जातो आणि सर्व महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवला जातो. अलिकडच्या काळात मुंबईला टार्गेट करणारे हे धमकीसत्र

26 ऑगस्ट । सोमालियातील दहशतवादी हल्ल्यासारखाच हल्ला मुंबईसह भारतात कुठेही होऊ शकतो, असा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना आला. या मेसेजचा क्रमांक सोमालियाचा असून त्यात कोणतीही धमकी मात्र दिलेली नाही. फक्त काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.

22 ऑगस्ट । अंधेरी पूर्वेला असलेल्या ललित या पंचतारांकित हॉटेलमध्ये पाच बॉम्ब पेरले आहेत. ते निकामी करण्यासाठी पाच लाखांची खंडणी द्या, अशी मागणी करणारा फोन हॉटेलमध्ये आला. हा फोन करणार्‍या दोघांना वापीतून अटक करण्यात आली.19 ऑगस्ट । मुंबईत पुन्हा 26/11 सारखा हल्ला चढवू, अशी धमकी देणारे एकापाठोपाठ एक मेसेज मुंबईच्या वाहतूक पोलिसांना आले. संशयितांनी त्यासाठी व्हीओआयपी किंवा स्टुफिंगचे तंत्र वापरून हा मेसेज पाकिस्तानातून पाठवण्यात आल्याचे दाखवले. हे मेसेज आले कोठून याचा शोध अजून लागायचा आहे.

14 ऑगस्ट । उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रुग्णालयाला धमकीचे फोन. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेला वेडसर निघाला.

08 ऑगस्ट । भायखळा रेल्वे स्थानक स्फोटाने उडवण्याची धमकी देणारा निनावी फोन रेल्वे पोलिसांना आला. भांडुपच्या एका रहिवाशाला अटक. मात्र आपला फोन हरवल्याचे त्याने सांगितले. 18 जुलै । सेरबियाला जाणार्‍या कतार एअरवेजच्या विमानात बसतानाच सुजन सरकार आणि समीर रॉय या दोघा बांग्लादेशींना रोखण्यात आले. 'दोन बांग्लादेशी अतिरेकी सरकार आणि रॉय या विमानाने प्रवास करत आहेत' असा ई-मेल आला होता. तपासणीअंती या दोघांना ओळखणार्‍या कुणीतरी हा खोडसाळपणा केल्याचे स्पष्ट झाले.

06 जानेवारी । अणुबॉम्बचा स्फोट घडवून मुंबईतील दोन रेल्वे स्थानके आणि एका अभिनेत्याचे घर तसेच एक धार्मिक स्थळ उडवण्याची धमकी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आली. हा फोन करणारा जबलपूरचा 40 वर्षीय गृहस्थ अटकेत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news