आरओचे पाणी देण्याची इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशनची योजना बंद

आरओचे पाणी देण्याची इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशनची योजना बंद
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  एक आणि पाच रुपयांत शुद्ध आरओचे पाणी देण्याची इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशनची (आयआरसीटीसी) योजना बंद झाल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने स्वतंत्रपणे ही सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई विभागातील 47 पैक्की 36 उपनगरीय स्थानकांत वॉटर वेंडिंग मशिन लावण्यासाठी निविदा काढली आहे. येत्या दोन महिन्यांत ही मशिन लागणार आहेत.

कोरोनाचे संक्रमण सुरु झाल्याने मार्च 2020 पासून रेल्वेची प्रवासी वाहतूक बंद झाली. तेव्हापासून स्थानकातील वॉटर वेंडिंग मशिन देखील बंद आहेत. एक रुपयातील पाणीदेखील बंद झाले. परिणामी, स्थानकांतील फूड स्टॉलवरील सीलबंद पाण्याच्या बाटल्यांचा खप मात्र मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

उपनगरी रेल्वे स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पश्चिम रेल्वेने विभागीय स्तरावर स्वतंत्र निविदा मागवल्या आहेत.यासंदर्भात मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी, वॉटर वेंडिंगसाठी मशिन उपलब्ध करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु केल्याचे सांगितले. एकूण 47 स्थानके असून यात चर्चगेट ते डहाणूपर्यंतच्या उपनगरीय 36 स्थानकांचाही समावेश आहे. एकूण 100 यंत्रे या 47 स्थानकांत उपलब्ध केली जातील. साधारण एक ते दीड महिना निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर त्यानंतरच ही सुविधा स्थानकांत उपलब्ध केली जाणार आहे .

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news