आ. जयंत पाटील काँग्रेसच्या वाटेवर?

आ. जयंत पाटील काँग्रेसच्या वाटेवर?

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत नुकतेच सूचक वक्तव्य केले होते.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम केल्यानंतर त्यांच्यासोबत 40 आमदार आले होते. यामधील काही ज्येष्ठ आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे; मात्र या जम्बो राजकीय कोलांटउडीवेळी पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडली नाही. तरीसुद्धा पाटील हे अजित पवार यांच्यासोबत येणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यांच्यासाठी एक कॅबिनेट मंत्रिपदही रिक्त ठेवल्याचे सांगण्यात येत होते. असे असतानाही पाटील हे शरद पवार यांच्या सोबतच राहिले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवार यांनी लहान पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील हे थेट काँग्रेसमध्ये जातील, अशी चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, जयंत पाटील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असतानाही त्यांना रोहित पवार यांच्या हाताखाली काम करावे लागत आहे. त्यांनी पक्ष उभारणीत शरद पवारांसोबत आयुष्य पणाला लावले; मात्र पक्षात त्यांचा अपमान होत असेल तर ते का राहतील, असा प्रश्नही शिरसाट यांनी उपस्थित केला आहे, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही हाय कमांडच्या निर्णयाचे स्वागत करण्यासंबंधीचे सूचक विधान केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news