Zilla Parishad Election: झेडपी–पंचायत समिती निवडणुकांचे वेळापत्रक बदलले; मतदान 7 फेब्रुवारीला

शासकीय दुखवट्याचा परिणाम; मतमोजणी 9 फेब्रुवारीला, राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय
Zilla Parishad Election
Zilla Parishad ElectionFile Photo
Published on
Updated on

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्यामुळे 12 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 ऐवजी आता 7 फेब्रुवारी रोजी मतदान होईल. तसेच, 7 ऐवजी 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल.

Zilla Parishad Election
Gold Silver Price Hike: सराफ बाजारात दरवाढीचा महाभूकंप; सोनं थेट 1.86 लाखांवर, चांदी 4 लाख पार

नव्या वेळापत्रकानुसार, 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. जाहीर प्रचाराची समाप्ती 5 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता होईल.

Zilla Parishad Election
विधिमंडळ नेता निवडा | प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांनी घेतली सुनेत्रा पवार यांची भेट

राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी 13 जानेवारी रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाली आहे. आता मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे बाकी होते.

Zilla Parishad Election
Mumbai | दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली वेगात

सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात 28 ते 30 जानेवारीपर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. परिणामी, निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये मतदानाच्या तारखेसह राज्य निवडणूक आयोगाने बदल जाहीर केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news