मुंबई, पालघरला यलो तर ठाणे, रायगडला आज ऑरेंज अलर्ट

Yellow alert for Mumbai, Palghar and orange alert for Thane, Raigad today
मुंबई, पालघरला यलो तर ठाणे, रायगडला आज ऑरेंज अलर्टFile Photo
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड तसेच कोकण किनारपट्टीला आज (रविवार) पावसाचा ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे.

Yellow alert for Mumbai, Palghar and orange alert for Thane, Raigad today
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली

आयएमडीच्या फोरकास्टनुसार, शनिवारी कोकण किनारपट्टीसह रायगडला रेड अलर्ट घोषित करण्यात आला होता. मुंबई आणि ठाण्याला यलो अलर्ट होता. रेड अलर्टनुसार, कोकणात मुसळधार पाऊस पडला. रायगडमध्येही पावसाची धुमशान सुरू आहे. मात्र, यलो अलर्ट असूनही मुंबई, ठाणे आणि पालघरमध्येही पावसाच्या दमदार सरी बरसल्या. रविवारपासून पुढील ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे यलो अलर्ट असूनही मुंबई आणि पालघरमध्ये सरींवर सरी बरसू शकतात.

Yellow alert for Mumbai, Palghar and orange alert for Thane, Raigad today
विशाळगड संकटात, गडावर जाणारच : संभाजीराजे आक्रमक

तापमानाचा अंदाज घेतल्यास, शनिवारी किमान २४ आणि कमाल २८ अंश सेल्सिअस तापमान होते. रविवारी त्याचीच पुनरावृत्ती अपेक्षित आहे. सोमवारी (२९ अंश सेल्सिअस) कमाल तापमानात एकाने वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारपासून, कमाल तापमानात घट अपेक्षित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news