Worli Podar Hospital: वरळीच्या पोदार आयुर्वेद इंस्टिट्यूटमध्ये 30 बेडचा आयसीयू कक्ष

ICU Ward | वरळी एक-दक्षिण विभागात महापालिकेचे स्वतंत्र हॉस्पिटल नसल्यामुळे शासनाच्या वरळी येथील पोदार आयुर्वेद इंस्टिट्यूटमध्ये (पोदार हॉस्पिटल) आयसीयू कक्ष उभारण्यात येत आहे.
City-wide ICU shortage; patients suffer
वरळीच्या पोदार आयुर्वेद इंस्टिट्यूटमध्ये 30 बेडचा आयसीयू कक्षPudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई : वरळी एक-दक्षिण विभागात महापालिकेचे स्वतंत्र हॉस्पिटल नसल्यामुळे शासनाच्या वरळी येथील पोदार आयुर्वेद इंस्टिट्यूटमध्ये (पोदार हॉस्पिटल) आयसीयू कक्ष उभारण्यात येत आहे. यासाठी पालिकेकडून 30 आयसीयू बेड देण्यात येणार आहेत. यासाठीच्या अन्य सेवा सुविधाही पालिकेतर्फे उभारण्यात येणार आहेत.

या सेवेचा वरळी, लोअर परेल व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना लाभ होणार आहे. कोविड कालावधीमध्ये मुंबई महानगरपालिकेने येथे विलगीकरण कक्ष उभारला होता. तसेच येथे 30 खाटांचे आयसीयू युनिट उभारण्याचे प्रस्तावीत केले होते. त्यानुसार आयसीयू कक्ष उभारण्यात येत असून याचे कामही सुरू आहे. यात वायरिंग कामे, सीसीटीव्ही लावणे नेटवर्कीग व टेलिफोन सुविधा, पब्लिक ऍड्रस सिस्टिम पुरवण्यात येणार आहे.

City-wide ICU shortage; patients suffer
Mumbai News : घराचा ताबा घ्यायला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा दारातच मृत्यू

अखंडीत विद्युत पुरवठ्यासाठी डिझेल जनरेटर भाडेतत्वावर पुरवण्यात येणार आहे. त्याशिवाय आयसीयु कक्षासाठी वातानुकुलन यंत्रणा, मेडिकल गॅस पाईपलाईन सिस्टीम, ऑक्सीजन, व्हॅक्युम व वैद्यकीय गॅस पुरवण्यासाठी कॉपर पाईपलाईन टाकणे, जम्बो सिलींडरकरिता मॅनिफोल्ड बसविणे, वैद्यकीय उपकरणे बसवली जाणार आहेत. यासाठी 8 कोटी 88 लाख रुपये इतके खर्च केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news