Worli SRA project : वरळीत एका बिल्डरच्या तीन तऱ्हा; रखडले एसआरए प्रकल्प

चिंताहरणी चिंतापुरणी रिएलटर्सला हटवण्याच्या नोटीसचे झोपु प्राधिकरणाकडून समर्थन
Worli SRA project
वरळीत एका बिल्डरच्या तीन तऱ्हा; रखडले एसआरए प्रकल्प(File Photo)
Published on
Updated on

मुंबई : वरळी कोळीवाडा येथील तीन झोपु प्रकल्पांना 13(2)ची नोटीस पाठवून विकासकाला काढून टाकण्यात आल्यानंतर तेथील झोपडीधारकांमध्ये एसआरएविरूद्ध संताप असला तरी विकासकाने प्रकल्प रखडवल्यानेच त्याच्यावर कारवाई केल्याचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे म्हणणे आहे. मे. चिंताहरणी चिंतापुरणी रिएलटर्स एलएलपी या एका बिल्डरच्या तीन तऱ्हांमुळे हे तीन प्रकल्प रखडल्याचे प्राधिकरणाच्या खुलाशातून स्पष्ट होत आहे.

वरळी कोळीवाड्यातील 3 एसआरए प्रकल्पांना झोपु प्राधिकरणाने 13(2) म्हणजेच विकासक काढून टाकण्याची नोटीस पाठवली आहे. यापैकी चैतन्य साई प्रकल्पाचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे प्रकल्प रखडला, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. तसेच सागर दर्शन प्रकल्पाचे काम सुरू असतानाही प्राधिकरणाने नोटीस पाठवल्यामुळे काम थांबले, असा आरोप रहिवासी करत आहेत.

Worli SRA project
‌BMC Election : ‘आप‌’चा ताप कुणाला होणार?

या रहिवाशांनी केलेल्या आंदोलनाचे वृत्त दैनिक पुढारीमध्ये 22 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध केले. वरळी कोळीवाड्यातील 10 हजार मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार असा या बातमीचा मथळा होता. या बातमीची दखल घेत झोपु प्राधिकरणाने सविस्तर खुलासा करत एकाच बिल्डरने हे तीन प्रकल्प कसे रखडवले हे सांगत त्याविरुद्ध बजावलेल्या नोटीसचे समर्थनच केले.

1. चैतन्य साई जनता कॉलनी एसआरए ही योजना 20 फेब्रुवारी 2023 रोजी स्वीकृत करण्यात आली होती. 28 हजार 353 चौरस मीटरचा हा भूखंड मुंबई महानगरपालिका, म्हाडा व महाराष्ट्र शासन यांच्या मालकीचा आहे. ही योजना सीआरझेड 3 व सीआरझेड 1च्या परिक्षेत्रात येते. एसआरएच्या सक्षम प्राधिकाऱ्यांनी मसुदा परिशिष्ट 2 तयार केले आहे. सीआरझेड, जमीन मालक, पर्यावरण विभाग यांची ना हरकत प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे सादर करण्यास चिंताहरणी चिंतापुरणी रिएलटर्सने दिरंगाई केल्यानेच हा प्रकल्प रखडला आहे.

2. म्हाडाच्या जमिनीवरील वरळी आदर्श नगर सागर दर्शन सहकारी गृहनिर्माण संस्था प्रकल्पाला मंजुरीचे आशयपत्र 30 सप्टेंबर 2022 रोजी देण्यात आले. इमारतीचा आराखडा 18 नोव्हेंबर 2022 रोजी मंजूर करण्यात आला. गेल्या तीन वर्षांत केवळ जोत्याचे काम पूर्ण झाले. विहीत मुदतीत प्रकल्प पूर्ण करण्यात विकासक चिंताहरणी चिंतापुरणी रिएलटर्स अपयशी ठरला आहे, याकडे झोपु प्राधिकरणाने लक्ष वेधले.

3. राधे कृष्ण एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था प्रकल्पाला 11 जानेवारी 2024 रोजी स्वीकृती देण्यात आली. मात्र मंजुरीसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता विकासक चिंताहरणी चिंतापुरणी रिएलटर्सने केलेली नाही.

या सर्व कारणांस्तव तिन्ही प्रकल्पांना झोपु प्राधिकरणाने 13(2)ची नोटीस बजावली. सर्व प्रकल्प मुदतीत पूर्ण होऊन झोपडीधारकांना सदनिका लवकरात लवकर मिळाव्यात व झोपु योजना रखडवणाऱ्या विकासकांना जरब बसावी, म्हणून ही कारवाई केल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.

Worli SRA project
Bhiwandi crime : भिवंडीमध्ये दोन दिवसांत चार अल्पवयीन मुले बेपत्ता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news