Nair Hospital Doctors Suspended: नायर’मध्ये दोन डॉक्टरांसह परिचारिका निलंबित; चिमुकल्याच्या मृत्यूनंतर कारवाई

वरळी बीडीडी चाळ गॅस सिलिंडर स्फोटातील चार महिन्यांच्या चिमुकल्याच्या मृत्यूनंतर नायर रुग्णालयातील कथित वैद्यकीय निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोन डॉक्टर आणि एका परिचारिकेला निलंबित करण्यात आले.
Nair Hospital Doctors Suspended
Nair Hospital Doctors SuspendedPudhari
Published on
Updated on

मुंबई: वरळी बीडीडी चाळीतील गॅस सिलिंडर स्फोटात गंभीररीत्या भाजलेल्या चार महिन्यांच्या चिमुकल्याच्या मृत्यूनंतर नायर रुग्णालयातील कथित वैद्यकीय निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला.

रुग्णालयातील जखमी रुग्णांकडे वैद्यकीय कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने दोन डॉक्टर आणि एका परिचारिकेला निलंबित केले.

या घटनेची गंभीर दखल घेत तत्कालीन अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. भाजलेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांचा समावेश असलेली समिती स्थापन करून सात ते आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

Nair Hospital Doctors Suspended
BMC Flood Management: महापालिकेचे १६ हजार कोटी गेले कुठे? मुंबईची तुंबई कायम

व्हायरल व्हिडिओमुळे प्रशासनावर टीकेची झोड

व्हायरल झालेल्या चित्रफितीत चार जखमी रुग्ण उपचाराच्या प्रतीक्षेत असल्याचे आणि त्यांच्याकडे वैद्यकीय कर्मचारी लक्ष देत नसल्याचे दिसत होते. या प्रकारावरून महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठली. प्राथमिकदृष्ट्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे वर्तन चुकीचे असल्याचे तत्कालीन अतिरिक्त महापालिका आयुक्त संजीव कुमार यांनी स्पष्ट केले.

Nair Hospital Doctors Suspended
PP Margacha Raja Ganeshotsav: मुस्लिम कुटुंबाकडून सलग १७ वर्षे गणरायाची मनोभावे सेवा; मुंबईच्या कामाठीपुऱ्यातील ‘पी. पी. मार्गाचा राजा’

नुकसानभरपाई देण्याची मागणी

महापालिका स्थायी समितीच्या बैठकीतही या प्रकरणावरून जोरदार चर्चा झाली. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मृत चिमुकल्याच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणीही करण्यात आली. नायर रुग्णालयाच्या अचानक पाहणीदरम्यान ३४ विभागप्रमुखांपैकी केवळ दोन जण रुग्णालयात उपस्थित असल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news