Family Dispute News: भावाच्या गाडीचा हप्ता भरण्यासाठी पत्नीनं मागितले १० हजार; नकार देताच जावयाला सासुरवाडीतच केलं रक्तबंबाळ

Family Dispute News
Family Dispute Newspudhari
Published on
Updated on

husband assaulted at in laws house: मुलाला इंग्रजी शाळेत टाकायचं की पालिकेच्या शाळेत या वादाचे रूपांतर मेहुण्याच्या गाडीच्या हप्त्यामध्ये झालं. त्यानंतर हा वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला आणि जावयाला सासरवाडीतच बेदम चोप देण्यात आला. ही घटना भांडुपमधील सोनापूर, राजीव गांधी नगर, मिश्रा चाळीत घडली.

Family Dispute News
Pimpri Chinchwad Family Dispute: आलिशान घरांतही ‘गृहकलह’ची धग; पैसा, प्रतिष्ठा असूनही नात्यांत ताण

मुलाच्या शाळेतील प्रवेशावरून वाद

ठाणे येथील सलून व्यावसायिक शेर मोहम्मद अन्सारी (35) यांचा मुलगा अरहान (09) हा सासू-सासऱ्यांकडेच राहतो. चार महिन्यांपूर्वी शेर मुलाला आपल्यासोबत घरी घेऊन आले. तेव्हा सासूने सांगितलं - "अरहानचं ॲडमिशन म्युनिसिपालिटी शाळा, सोनापूरला करायचंय." पण शेर यांना मुलाला ऑक्सफर्ड हायस्कूल, शांतीनगर, ठाणे येथे टाकायचं होतं. यावरून सासू-सून आणि जावयामध्ये खटके उडाले.

दि. 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7.38 वाजता पत्नीची बहीण शबाना खानचा व्हॉट्सअॅप मेसेज आला - "माझ्या बहिणीला आमचे घरी पाठवून द्या". शेर यांनी पत्नीला मुलींसह भांडुपला तिच्या माहेरी, रूम नं. 03 मध्ये पाठवून दिलं.

Family Dispute News
Palghar Family Dispute Case: पालघरमध्ये कौटुंबिक कलहातून विष प्राशन आईचा मृत्यू; दीड वर्षाच्या बालिकेची मृत्यूशी झुंज

भावाच्या गाडीचा हप्ता अन् मारहाण

रात्री 11.30 वाजता मुलांना भेटण्यासाठी मित्र समीर (25) सोबत ते सासरवाडीत गेले. तिथेच पत्नीने बॉम्ब टाकला - "माझ्या भावाचा गाडीचा हप्ता भरायचाय, 10 हजार आणून दे."

"माझ्याकडे पैसे नाहीत" असं म्हणताच घरातलं वातावरण तापलं. आरोपानुसार, मेहुणा शफीक मोहम्मद खान (23) याने शिवीगाळ करत हाताने मारहाण सुरू केली. शेर घराबाहेर पडले, पण मेहुणी शबानाने फोन करून दोन्ही भाऊ अजहर खान आणि अमीर खान यांना बोलावलं.

Family Dispute News
Belgaum family dispute: पतीने कोंडलेल्या पत्नी-मुलांची सुटका

जावयाला केलं रक्तबंबाळ

मग तिघा-चौघांनी मिळून शेर यांना घेरलं. अजहरने नाकावर जोरात ठोसा मारला, चक्कर येऊन ते खाली कोसळले. त्याचा मित्र साजिद याने कानावर वार करून जखमी केलं. रक्तबंबाळ अवस्थेत मित्र समीरने त्यांना रिक्षात टाकून मुलुंडच्या अग्रवाल हॉस्पिटलमध्ये नेलं.

तिथून त्यांना घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं. तब्बल 6 दिवस उपचार घेतल्यानंतर अखेर 9 सप्टेंबर 2026 रोजी त्यांनी भांडुप पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी अजहर खान, अमीर खान, शफीक मोहम्मद खान आणि साजिद या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news