महाराष्ट्रात तूर्त विधानसभा निवडणूक का नाही? ECI ने दिले स्पष्टीकरण

Maharashtra Assembly Election | विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरपर्यंत
Maharashtra Assembly Election
महाराष्ट्रात अद्याप विधानसभा निवडणूक का नाही? निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरणfile photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (दि.१६ ऑगस्ट) जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. पण झारखंड आणि महाराष्ट्रातील निवडणुकीची (Maharashtra Assembly Election) तारीख आज जाहीर केली नाही. आज दोन राज्यांतील निवडणुकांची घोषणा करताना महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची तारीख का जाहीर करण्यात आली नाही, या संदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत महत्त्वाचे कारण दिले. या संदर्भातील वृत्त 'हिंदुस्थान टाईम्स'ने दिले आहे.

पुढील काही महिने महाराष्ट्रात अनेक सण-उत्सव

CEC राजीव कुमार म्हणाले, “गेल्या वेळी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या होत्या. त्यावेळी जम्मू-काश्मीर निवडणूक यादीत नव्हते. पण यंदा चार राज्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे २-२ चे गट केले आहेत. तसेच यंदा जम्मू काश्मीरमध्ये आम्हाला अधिक मनुष्यबळ लागणार आहे. पुढील काही महिने महाराष्ट्रात अनेक उत्सव आहेत. यामध्ये गणपती, नवरात्र, पितृपक्ष आणि दिवाळी सारखे सण आहेत. तसेच पावसाळ्यामुळे पण निवडणूक गट अधिकाऱ्यांची कामे अजून पूर्ण व्हायची असल्याने तूर्त महाराष्ट्रात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला नसल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वाट पाहावी लागणार?

महाराष्ट्रात विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणुक आयोग पहिल्याच टप्प्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तारखा जाहीर करेल, असे वाटत होते. राज्यातील राजकीय मंडळी, त्यांचे कार्यकर्ते आणि जनता यांचे लक्ष लागून राहिलेल्या विधानसभा निवडणूक तारखांसाठी आता वाट पाहावी लागणार आहे. परंतु आयोगाने पहिल्या घोषणेदरम्यान जम्मू काश्मीरमध्ये ३ टप्प्यात १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर,१ ऑक्टोबर तर हरियाणामध्ये एकाच टप्प्यात १ ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर दोन्ही राज्यातील निकाल ४ ऑक्टोबरला जाहीर होणार असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news