Who is Sushant Doshi: पहिला पगार 2 हजार रुपये, आज एका बड्या कंपनीचा मालक

कोल्हापूरच्या सुशांत दोशी यांचा प्रवास कोणत्याही चित्रपटाच्या कथेला मागे टाकेल इतका प्रेरणादायी आहे.
Who is Sushant Doshi
Who is Sushant DoshiPudhari
Published on
Updated on

कोणताही बदल एका रात्रीत होत नाही; त्यासाठी एखाद्या दूरदृष्टी असलेल्या नेत्याला स्वतः झोकून देऊन काम करावे लागते. सुशांत दोशी हे अशाच एका ‘व्हिजनरी’ आणि धाडसी युवा उद्योजकाचे नाव आहे. कोल्हापूरच्या सुशांत दोशी यांचा प्रवास कोणत्याही चित्रपटाच्या कथेला मागे टाकेल इतका प्रेरणादायी आहे.

सन २००६ मध्ये त्यांनी ‘बीपीएल’ कंपनीत सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्रात काम करीत आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. त्या वेळी त्यांचा महिन्याचा पगार अवघा २,००० रुपये इतका होता. परंतु पगार लहान असला, तरी त्यांच्या महत्त्वाकांक्षा आणि स्वप्ने आभाळाएवढी मोठी होती.

Who is Sushant Doshi
EV Charging Stations: ईव्ही चार्जिंग स्टेशन ही भविष्यात सोन्याची खाण ठरतील असे या तरुण उद्योजकाला का वाटते?

मार्केटिंगच्या क्षेत्रात काम करीत असताना त्यांनी थेट ग्राहकांशी संवाद साधत जेवढे शिकता येईल तेवढे शिकण्याचा निर्धार केला. बाजारपेठेतील चढ-उतार अनुभवले आणि ‘मार्केट सायकॉलॉजी’ अत्यंत जवळून समजून घेतली. कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात आपली स्वतःची ओळख निर्माण केली.

‘एक निर्णायक क्षण’ कोविडनंतरचा काळ हा संपूर्ण जगासाठी स्थित्यंतराचा होता. कोरोना महामारीच्या संकटातून जग बाहेर पडत असताना ऑटोमोबाईल क्षेत्रात अंतर्गत हालचाली सुरू होत्या. याच काळात सुशांत यांच्या आयुष्यात तो ‘एक निर्णय क्षण’ आला, जेव्हा त्यांनी ओळखले, की भविष्यातील सर्वात मोठा व्यवसाय हा ‘इलेक्ट्रिक व्हेईकल्स’ आणि ‘हरित ऊर्जा’ हाच असणार आहे.

त्यांनी केवळ भावनेच्या भरात निर्णय घेतला नाही, तर सलग दोन वर्षे या संपूर्ण परिसंस्थेचा अत्यंत सूक्ष्म आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला. ग्राहकांच्या नेमक्या अडचणी काय आहेत, सरकारची धोरणे कोणती आहेत, आणि यामध्ये तांत्रिक आव्हाने कोणती आहेत, या सर्व बाबींचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर, सन २०२१ मध्ये त्यांनी ‘अल्ट्रा ग्रीन पॉवर नेक्सस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची स्थापना केली.

अवघ्या काही वर्षांतच त्यांनी आपल्या उत्कृष्ट व्यवस्थापनकौशल्याच्या आणि नेटवर्कच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रात १३ पेक्षा अधिक कार्यालये सुरू करून एक मजबूत नेटवर्क उभे केले आहे. आज त्यांनी स्वतःसाठी आणि आपल्या सहकार्‍यांसाठी २०० कोटींचे बिझनेस टार्गेट ठेवले असून, त्यांची वाटचाल अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news