EV Charging Stations: ईव्ही चार्जिंग स्टेशन ही भविष्यात सोन्याची खाण ठरतील असे या तरुण उद्योजकाला का वाटते?

कोल्हापूरचे युवा उद्योजक सुशांत दोशी ‘अल्ट्रा ग्रीन पॉवर नेक्सस’ या कंपनीच्या माध्यमातून या ईव्ही क्रांतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावीत आहेत.
EV Charging Stations
EV Charging StationsPudhari
Published on
Updated on

जागतिक तापमानवाढ, पर्यावरणाचा र्‍हास यांमुळे जगाला आता शाश्वत इंधन पर्यायाची ओढ लागली आहे. त्यामुळेच इलेक्ट्रिक वाहन क्रांती हा केवळ वाहतुकीतील बदल नसून, ती पर्यावरणीय आणि आर्थिक आत्मनिर्भरतेची नवी ‘जागतिक हाक’ आहे. कोल्हापूरचे युवा उद्योजक सुशांत दोशी ‘अल्ट्रा ग्रीन पॉवर नेक्सस’ या कंपनीच्या माध्यमातून या ईव्ही क्रांतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावीत आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रात ‘ई-व्हेईकल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर’चे सक्षम जाळे विणत श्री. दोशी एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण करतानाच, स्वच्छ आणि स्मार्ट महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी योगदान देत आहेत. भविष्यातील या संधीचा हिस्सा बनणे, ही केवळ जबाबदारी नसून, एक क्रांतिकारी सुरुवात आहे.

समस्या अनेक, उत्तर एकच - ई-वाहनांचा वापर

सध्या जगभर वातावरणबदल हा सर्वात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रदूषणाच्या आणि जागतिक तापमानवाढीच्या विळख्यातून जगाला वाचविण्यासाठी इलेक्ट्रिकवाहनांचा वापर वाढविणे, हाच एकमेव शाश्वत मार्ग आहे. शहरांतील वायुप्रदूषणात ७० टक्क्यांहून अधिक वाटा वाहनांच्या धुराचा असतो. इलेक्ट्रिक वाहने ‘शून्य प्रदूषण’ करून भावी पिढीला शुद्ध हवा देण्याचे काम करतात.

जागतिक स्तरावर ‘जीवाश्म इंधना’कडून ‘क्लीन ऊर्जे’कडे वेगाने स्थित्यंतर होत आहे. युरोप, चीन आणि अमेरिकेने पेट्रोल- डिझेलवर चालणारी वाहने टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे धोरण निश्चित केले आहे. भारतही ‘फेम’सारख्या योजनांच्या माध्यमातून या दिशेने महत्त्वाची पावले टाकत आहे. जागतिक बाजारात ई-वाहनांची मागणी दरवर्षी दुप्पट होत असून, प्रमुख कंपन्यांनी आता ईव्ही तंत्रज्ञानावर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.

बॅटरी तंत्रज्ञान : ईव्ही क्रांतीचे खरे ‘इंजिन’

बॅटरी तंत्रज्ञानातील प्रगतीने ईव्हीला केवळ एक ‘पर्याय’ न ठेवता, ‘सर्वोत्तम निवड’ बनविले आहे :

- टप्पा १ (लिथियम-आयन युग) : निकेलच्या जड बॅटरी जाऊन हलक्या व शक्तिशाली लिथियम-आयन बॅटरी आल्या; ही ई-वाहनांच्या क्रांतीची खर्‍या अर्थाने पायाभरणी होती.

- टप्पा २ (एनर्जी डेन्सिटी वाढ) : आकार तोच, पण ऊर्जा जास्त! यामुळे ‘रेंज एन्झायटी’ संपली आणि ईव्ही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सक्षम झाली.

- टप्पा ३ (LLP सुरक्षितता) : भारताच्या उष्ण हवामानासाठी ‘LLP’ तंत्रज्ञान वरदान ठरले. बॅटरीचे आयुष्य दुप्पट झाले आणि आगीचा धोका पूर्णपणे टळला.

- टप्पा ४ (पर्यावरण व रिसायकलिंग) : पर्यावरणपूरक घटकांचा वापर आणि प्रगत रिसायकलिंगमुळे बॅटरीनिर्मितीचा खर्च निम्म्यावर आला, परिणामी ईव्ही अधिक स्वस्त झाल्या.

- टप्पा ५ (भविष्यातील ऊर्जा तंत्रज्ञान : सोडियम-आयन आणि सॉलिड-स्टेट) : लिथियमच्या मर्यादा ओलांडून ‘सोडियम’ (मीठ) आणि ‘सॉलिड-स्टेट’ तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. यामुळे बॅटरीचा खर्च आणखी कमी होऊन, सुरक्षिततेत वाढ होईल आणि चार्जिंगचा वेळ अवघ्या १०-१५ मिनिटांवर येईल.

ईव्ही स्टेशन : ईव्ही क्रांतीचा कणा

- विश्वासार्हता : पेट्रोल पंपांप्रमाणे चार्जिंग स्टेशन्सचे जाळे निर्माण झाल्याशिवाय सामान्य माणूस ईव्हीकडे वळणार नाही.

- रेंज एन्झायटीचा अंत : हायवेवरील ‘फास्ट चार्जिंग’मुळे लांबचा प्रवास निर्धास्त होईल.

- शहरी गरजा : अपार्टमेंट्समध्ये राहणार्‍या ईव्ही धारकांसाठी सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स हेच मुख्य आधार आहेत.

- भारतासाठी रोडमॅप (२०२६-३०) विस्तार : हायवेवर दर २५ किमीवर आणि शहरात दर ३ किमीवर फास्ट चार्जिंग स्टेशन उभारण्याचे लक्ष्य.

- व्यावसायिक भागीदारी : मॉल्स, हॉटेल्स आणि हायवे हॉटेल्समध्ये ‘कमर्शिअल चार्जिंग हब्स’ उभारण्यावर भर.

- भविष्यातील चित्र : जागतिक स्तरावरील ‘स्मार्ट ग्रिड’ आणि ‘बॅटरी स्वॅपिंग’ तंत्रज्ञानाचा वापर करून भारत इंधन स्वावलंबी होईल.

ईव्ही चार्जिंग स्टेशन नव्हे, सोन्याची खाण

‘अर्ली अ‍ॅडॉप्टर स्टेज’ आणि ‘विन-विन’ बिझनेस मॉडेल व्यवसाय जगताचा एक शाश्वत नियम आहे. The First Mover Advantag म्हणजेच जी व्यक्ती एखाद्या नव्या क्षेत्रात सुरुवातीला प्रवेश करते, तीच पुढे जाऊन त्या मार्केटचा राजा बनते. ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन आज त्या टप्प्यावर आहे. सध्या ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन क्षेत्र हे आपल्या ‘सुरुवातीच्या काळात’ आहे. पुढील ५ ते १० वर्षांत जेव्हा रस्ते ई-वाहनांनी भरून जातील, तेव्हा आज लावलेली चार्जिंग स्टेशन्स सोन्याची खाण ठरणार आहेत.

अल्ट्रा ग्रीन पॉवर नेक्सस : कम्प्लीट ईव्ही इकोसिस्टीम

‘अल्ट्रा ग्रीन पॉवर नेक्सस’ केवळ चार्जिंग स्टेशन उभारणारी कंपनी नसून, ती एक पूर्ण ईव्ही इकोसिस्टीम पुरविणारी संस्था आहे :

- प्रगत बॅटरी सोल्युशन्स : विविध वाहन मॉडेल्सच्या गरजेनुसार अचूक बॅटरी व्यवस्थापन आणि अद्ययावत तांत्रिक साहाय्य.

- डीसी फास्ट चार्जर्स : महामार्ग आणि व्यावसायिक केंद्रांवर ३० ते ४५ मिनिटांत ८० टक्के चार्जिंग देणारी हायस्पीड सुविधा, त्यामुळे वेळेची मोठी बचत.

- स्मार्ट ग्रिड आणि क्लाउड मॉनिटरिंग : प्रत्येक स्टेशन ‘२४/७’ एका मध्यवर्ती क्लाउड सिस्टीमशी जोडलेले आहे. त्यामुळे थेट तांत्रिक देखरेख आणि बिघाडांची दुरुस्ती त्वरित करणे शक्य होते.

- पेमेंट गेटवे आणि अ‍ॅप सपोर्ट : युजर-फ्रेंडली मोबाईल अ‍ॅपद्वारे जवळचे स्टेशन शोधणे, स्लॉट बुकिंग करणे आणि कॅशलेस पेमेंट करणे आता एका क्लिकवर शक्य आहे.

स्मार्ट हायब्रीड चार्जिंग तंत्रज्ञान

- ‘अल्ट्रा ग्रीन पॉवर नेक्सस’चे चार्जिंग तंत्रज्ञान हे ईव्ही बॅटरीच्या दीर्घायुष्यासाठी वरदान ठरते. ‘अल्ट्रा ग्रीन’चे ‘स्मार्ट हायब्रीड तंत्रज्ञान’ तीन टप्प्यांत काम करण्यासाठी डिझाईन केले आहे.

- सुरुवातीचे १० टक्के (AC Slow Charging) : बॅटरी सुरक्षितपणे स्टार्टअप करण्यासाठी हळुवार चार्जिंग.

- मध्यवर्ती ८० टक्के (DC Fast Charging) : वेळेची बचत करण्यासाठी वेगवान चार्जिंग.

- अंतिम १० टक्के (AC Trickle Charging) : बॅटरी ओव्हरहीट टाळण्यासाठी पुन्हा संथ चार्जिंग.

स्मार्ट हायब्रीड चार्जरचे फायदे :

- सेल्सवर अचानक ताण न आल्याने ‘थर्मल रनवे’ (आगीचा धोका) शून्यावर येतो.

- हायब्रीड पद्धतीमुळे बॅटरीचे आयुष्य २० ते ३० टक्क्यांनी वाढते.

ईव्ही क्रांती : सर्वांसाठी संधी सरकार आणि देशासाठी

- परकीय चलनाची मोठी बचत : तेल आयातीवर होणारा लाखो कोटींचा खर्च वाचून रुपया मजबूत होईल.

- ऊर्जा स्वावलंबन : जागतिक तेल बाजारातील अस्थिरतेवर अवलंबून राहण्याची गरज उरणार नाही.

- ‘नेट झीरो’ ध्येयप्राप्ती : २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्य करण्याचे उद्दिष्ट गाठणे शक्य होईल.

- विकास निधीची उपलब्धता : इंधनावरील अनुदानाचा पैसा रस्ते, शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी वापरता येईल.

- ‘आत्मनिर्भर भारत’: स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होईल.

ग्राहकांसाठी

- मोठी आर्थिक बचत : पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत ईव्हीचा प्रति किलोमीटर खर्च खूपच कमी आहे.

- कमी देखभाल खर्च : ईव्हीमध्ये इंजिनचे पार्ट कमी असल्याने दुरुस्तीचा खर्च निम्म्याने कमी होतो.

- प्रगत सुरक्षा : बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम (BMS) आणि स्मार्ट हायब्रीड चार्जिंगमुळे वाहन सुरक्षित राहते.

- डिजिटल सोय : मोबाईल अ‍ॅपद्वारे चार्जिंग स्लॉट बुकिंग आणि कॅशलेस पेमेंटची सुलभता मिळते.

- शांत आणि प्रदूषणमुक्त प्रवास : ध्वनिप्रदूषण नाही, गाडी चालविताना मिळणारा अनुभव अधिक सुखद

उद्योजकांसाठी

- ‘फर्स्ट मूव्हर’चा फायदा : सुरुवातीच्या काळात या क्षेत्रात उतरल्यामुळे भविष्यातील मोठ्या मार्केटवर पकड निर्माण होते.

- शाश्वत उत्पन्नाचा स्रोत : चार्जिंग स्टेशन हे एकदा उभारले, की दरमहा हक्काचे उत्पन्नाचे साधन बनते.

- दुहेरी व्यावसायिक नफा : चार्जिंगला आलेल्या ग्राहकांमुळे हॉटेल/कॅफे व्यवसायातील विक्रीत मोठी वाढ होते.

- डिजिटल मॉनिटरिंग : क्लाउड सिस्टीममुळे व्यवसायावर चोवीस तास आणि कोठूनही नियंत्रण ठेवता येते.

- भविष्यातील गरज : ईव्ही गाड्यांची संख्या वाढत असल्याने हा व्यवसाय येणार्‍या दशकात कधीही न संपणारी ‘सोन्याची खाण’ ठरणार आहे.

भारतातील ई-वाहनवाढीचा आलेख (२०२३ - २०३०)अंदाजित ई-वाहनांची संख्या (कोटींमध्ये)

ई-वाहनांची संख्या

सुरुवातीचा काळ ०.३०

वाढीव स्वीकार ०.६०

वेगवान वाढ १.००

पायाभूत सुविधा विस्तार १.५०

बाजारातील सक्रिय सहभाग २.२०

मोठ्या प्रमाणावर वापर ३.२०

ईव्ही वाहने मुख्य प्रवाहात ४.१०

लक्ष्य प्राप्ती ५.००

इलेक्ट्रिक वाहने आणि चार्जिंग स्टेशन्स ही केवळ फॅशन नसून, आत्मनिर्भर भारताची गरज आहे. युद्धासारखे जागतिक संकट, प्रदूषण, महागडे आयात इंधन यांमुळे निर्माण होणार्‍या महागाईच्या विळख्यातून वाचण्यासाठी ‘ग्रीन एनर्जी’ हाच एकमेव मार्ग आहे. आम्ही ‘अल्ट्रा ग्रीन पॉवर नेक्सस’च्या माध्यमातून नवीन उद्योजकांना सोबत घेऊन भविष्यातील एका स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त भारताची पायाभरणी करीत आहोत.

- सुशांत दोशी, चेअरमन, अल्ट्रा ग्रीन पॉवर नेक्सस प्रा. लि.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news