Ratan Tata Passes Away : रतन टाटा यांचा उत्तराधिकारी कोण?

देशातील सर्वात प्रतिष्ठित टाटा उद्योग समूहाची कमान कोणाच्या हाती?
Ratan Tata Passes Away
नोएल टाटा आणि रतन नवल.(file photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ख्यातनाम उद्योजक आणि टाटा उद्योग समूहाचे अध्वर्यू रतन नवल टाटा (Ratan Tata Passes Away) यांचे बुधवारी रात्री दीर्घ आजाराने वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. गेल्या सोमवारी पहाटे रक्तदाब कमी झाल्याने रतन टाटांना ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने देशभर शोककळा पसरली आहे. दरम्यान, रतन टाटा यांच्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी म्हणून रतन टाटांचे सावत्र बंधू नोएल टाटा (Noel N. Tata) यांचे नाव चर्चेत आहे.

नोएल टाटा यांच्याविषयी...

टाटा सन्सच्या वेबसाईटवर नोएल टाटा यांचे प्रोफाईल आहे. त्यावरील माहितीनुसार, नोएल एन. टाटा हे टाटा समुहाशी (Tata Group) ४० वर्षांपासून जोडले गेले आहेत. सध्या ते टाटा समुहातील विविध कंपन्यांच्या मंडळावर काम करत आहेत. ते ट्रेंट, टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, व्होल्टास आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि टाटा स्टील आणि टायटन कंपनी लिमिटेडचे उपाध्यक्ष आहेत. नोएल टाटा हे सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट मंडळावर विश्वस्त म्हणूनही काम करतात.

नोएल टाटांच्या तीन मुलांची पाच संस्थांच्या मंडळावर नियुक्ती

या वर्षाच्या सुरुवातीला, टाटा समूहाने नोएल टाटा यांच्या तीन मुलांची पाच संस्थांच्या मंडळावर नियुक्ती करण्यात आली होती. लिआ, माया आणि नेव्हिल यांना पाच ट्रस्टचे विश्वस्त बनवण्यात आले. ज्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट, टाटा ट्रस्टमधील प्राथमिक संस्थांशी संलग्न आहेत. या पाच ट्रस्टची टाटा सन्समध्ये भागीदारी आहे. टाटा ट्रस्टचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी यासाठी मान्यता दिल्यानंतर या वर्षी ६ मे रोजी त्यांना नवीन पदांची जबाबदारी देण्यात आली होती.

वारस म्हणून माया टाटांचे नावही चर्चेत

रतन टाटा यांच्यानंतर कोण, या प्रश्नाच्या उत्तरात त्यांची ३४ वर्षीय पुतणी माया टाटा यांचेही नाव घेतले जात आहे. रतन टाटांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांची माया (Maya Tata) ही कन्या असून त्या टाटा समूहातील टाटा मेडिकल सेंटर ट्रस्टवर संचालक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्यासोबत त्यांची भावंडे लिआ आणि नेव्हिलदेखील या ट्रस्टवर काम करतात. टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून अचानक जावे लागलेले आणि अलीकडेच कार अपघातात मृत्युमुखी पडलेले सायरस मिस्त्री यांची बहीण अलू मिस्त्री ही मायाची आई आहे. आपल्या भावंडांमध्ये सर्वात तरुण असूनही माया टाटा यांनी टाटा समूहात झपाट्याने प्रगती केली असून, महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. ब्रिटनच्या वार्विक विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या माया यांनी टाटा अपॉर्च्युनिटीज फंडपासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. नंतर त्या टाटा डिजिटलकडे वळल्या आणि ‘टाटा नेवू’ अ‍ॅप सुरू करण्यात त्यांची निर्णायक भूमिका राहिली. टाटा फंडमध्ये काम करताना गुंतवणूकदारांचा मोठा परिवार निर्माण करण्याची मोठी कामगिरी त्यांनी करून दाखवली.

Ratan Tata Passes Away
'गुडबाय डियर लाईटहाऊस...' रतन टाटांचा जिवलग मित्र शंतनूची भावनिक पोस्ट

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news