'गुडबाय डियर लाईटहाऊस...' रतन टाटांचा जिवलग मित्र शंतनूची भावनिक पोस्ट

Ratan Tata | प्रख्यात उद्योगपती रतन टाटा यांचे निधन
Shantanu Naidu emotional post
रतन टाटांचा जिवलग मित्र असलेल्या शंतनूची भावनिक पोस्ट file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : ख्यातनाम उद्योजक रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. अनेक राजकीय व्यक्तींनी भारताच्या 'अमूल्य रत्ना'ला आदरांजली वाहीली आहे. रतन टाटा यांचे सहाय्यक तसेच जिवलग मित्र आणि त्यांच्यासोबत सावलीसारखे राहणारे शंतनू नायडू यांनीही त्यांच्याबद्दल एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

रतन टाटा यांचे विश्वासू सहाय्यक शंतनू नायडू यांनी रतन टाटांसोबतचा स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. पोस्टमध्ये शंतनू यांनी रतन टाटा यांच्यासोबतच्या घनिष्ठ मैत्री बद्दल सांगताना लिहिले आहे की, 'या मैत्रीमुळे माझ्यात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढण्यासाठी मी माझे उर्वरित आयुष्य घालवीन. दु:ख ही प्रेमासाठी मोजावी लागणारी किंमत आहे. गुडबाय माय डियर लाईटहाऊस'.

रतन टाटा आणि शंतनू यांची मैत्री

कॉर्नेल विद्यापीठातून एमबीए झालेले शंतनू नायडू २०१७ पासून टाटा ट्रस्टमध्ये काम करत आहेत. नायडू यांनी टाटा एल्क्सीमध्ये डिझाईन अभियंता म्हणूनही काम केले आहे. रतन टाटा यांनी शंतनू नायडू यांची एक फेसबुक पोस्ट वाचल्यानंतर त्यांना भेटीसाठी आमंत्रित केले होते. पोस्टमध्ये शंतनू यांनी भटक्या कुत्र्यांसाठी रिफ्लेक्टरसह डॉग कॉलरबद्दल लिहिले होते, जेणेकरुन वाहन चालक रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना पाहू शकतील. गेल्या १० वर्षात शंतनू नायडू हे रतन टाटा यांचे जवळचे आणि विश्वासू मित्र बनले होते. रतन टाटा अनेक कार्यक्रमांना जाताना नायडू यांना सोबत घ्यायचे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news