Pankaja Munde |विधान परिषदेसाठी संधी दिल्याबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

विधान परिषदेसाठी आज अर्ज दाखल करणार
 Pankaja Munde Nomination for Legislative Council
भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांना पक्षाने विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. ANI Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बीड लोकसभा निवडणुकीत धक्कादायकरित्या पराभव झाल्यानंतर भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांना पक्षाने विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मी विधानपरिषदेसाठी उमेदवारी दाखल करणार आहे. लोकसभा निवडणुकीत चांगली लढत देऊनही मला काही मतांनी पराभव स्वीकारावा लागला. मला संधी दिल्याबद्दल मी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाचे आभार मानते, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

 Pankaja Munde Nomination for Legislative Council
BJP News| पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन; प्रादेशिक समतोलही साधला

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी आज (दि.२) सकाळी श्री सिध्दिविनायकाचे मनोभावे दर्शन घेतले. त्यानंतर निवासस्थानी आईने व कुटुंबातील सदस्यांनी औक्षण केले. यावेळी राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारून त्या विधानभवनाकडे रवाना झाल्या.

पंकजा मुंडे यांचे भाजपश्रेष्ठींनी राजकीय पुनर्वसन

२०१९ पासून राजकीय वनवास सहन करणाऱ्या आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या पंकजा मुंडे यांचे भाजपश्रेष्ठींनी राजकीय पुनर्वसन केले आहे. १२ जुलैला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news