Western Railway TC Body | पश्चिम रेल्वेचा हाय-टेक निर्णय! आता टीसी आणि प्रवाशांमधील संभाषण होणार रेकॉर्ड

Western Railway TC Body | उपनगरीय लोकल प्रवासात तिकीट तपासनीस आणि प्रवाशांची नेहमीच एकमेकांशी काहीतरी कुरबुर किंवा उद्धटगिरी होत असते.
Western Railway TC Body
Western Railway TC Body
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
उपनगरीय लोकल प्रवासात तिकीट तपासनीस आणि प्रवाशांची नेहमीच एकमेकांशी काहीतरी कुरबुर किंवा उद्धटगिरी होत असते. काही घटनेत एकमेकांवर गैरवर्तनाचा आरोपही केला जातो. तसेच तिकीट तपासणी करताना प्रवाशांची लूट केल्याची प्रकरणे घडली आहेत.

Western Railway TC Body
Third Mumbai development: अटल सेतूपासून गावकुसापर्यंत रायगडचा विकासवेग; ‘तिसऱ्या मुंबई’च्या उभारणीला नवी दिशा

अशा अयोग्य गोष्टींना आळा घालण्यासाठी यापुढे तिकीट तपासनीस आणि प्रवाशांचा संवाद रेकॉर्ड केला जाणार आहे. त्यासाठी खास तपासनीस यांना विशेष जॅकेट आणि बॉडी कॅमेरे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून दिले जाणार आहेत.


पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार तिकीट तपासणीच्या कामाला अधिक हाय-टेक बनवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला मुंबई सेंट्रल विभागाकडून 'नमस्ते' मोहिमेचा एक भाग म्हणून 'बॉडी-वर्न' कॅमेऱ्यांच्या संकल्पनेची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी केली जाणार आहे.

Western Railway TC Body
Navi Mumbai International Airport | नवी मुंबई विमानतळाची हवाई वाहतूक अचानक घसरली; दररोजच्या उड्डाणांची संख्या 100 वर

या प्रकल्पांतर्गत १५ बॉडी कॅमेरे आणि ३० विशेष डिझाइन केलेले जॅकेट्स खरेदी केले जात आहेत. सुरुवातीला एसी लोकल ट्रेनसाठी ते वापरले जातील. पुढील आठवड्यात त्याची सुरुवात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

असे होणार बोलणे रेकॉर्ड

  • युनिफॉर्मवर बॉडी कॅमेरा व जॅकेट्स : कामावर असताना टीसीच्या युनिफॉर्मवर हा बॉडी कॅमेरा आणि जॅकेट्स असणार आहे.

  • रेकॉर्डिंग तंत्रज्ञान : व्हिडियो आणि संभाषणे रेकॉर्ड करण्यासाठी 'एसडी-कार्ड' आधारित रेकॉर्डिंग आणि मायक्रोफोनचा वापर केला जाणार आहे.

  • तपासणी व विश्लेषण : रेकॉर्ड केलेल्या साहित्याचे वेळोवेळी तपासणी आणि विश्लेषण केले जाणार आहे.

  • वादांवर आळा : तिकीट चेक करताना होणारे वाद, हाणामारी आणि हल्ल्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर टीसी आणि प्रवासी यांच्यातील संपूर्ण संवाद रेकॉर्ड केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news