Vinod Tawde Rjya Sabha Candidate: बिहार निवडणुकीचं बक्षीस... विनोद तावडेंची राज्यसभेत होणार एन्ट्री; BJP चे आणखी ३ उमेदवार कोण?

Vinod Tawde Rjya Sabha Candidate
Vinod Tawde Rjya Sabha Candidatepudhari
Published on
Updated on

Vinod Tawde Rjya Sabha MP: भाजपचे राष्ट्रीय महासचीव विनोद तावडे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. विनोद तावडेंकडे नुकत्याच झालेल्या बिहार निवडणुकीची जबाबदारी होती. या निवडणुकीत भाजपनं दमदार कामगिरी केली होती. त्याचेच बक्षीस विनोद तावडेंना मिळाल्याचे जाणकारांचे मत आहे.

विशेष म्हणजे राज्यसभा उमेदवारीसाठी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे. भाजपनं विनोद तावडे यांचे तिकीट निश्चित केलं आहे. आता भाजपचे आणखी तीन उमेदवार कोण याबाबत चर्चा सुरू असतानाच भाजपने रामदास आठवले, माया चिंतामण ईवनाते आणि रामराव वडकुते यांची नावे घोषित केली.

2019 मध्ये पक्षानं कापलं होतं तिकीट...

विनोद तावडे राज्यसभेवर जात आहेत. त्यांनी 1985 ते 95 हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रचारक म्हणून त्यांनी काम पाहिलं. ते 1995 पासून भाजपामध्ये ते सक्रिय आहेत. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तर मुंबई भाजपाचा अध्यक्ष पद देखील त्यांनी भूषवले.

ते विधान परिषदेचे 13 वर्ष सदस्य राहिले आहेत तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून देखील काम पाहिल आहे. 2014 मध्ये बोरीवली मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले भाजपा शिवसेना सरकारमध्ये शालेय शिक्षण उच्च व तंत्र शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलय. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षानं त्यांचं तिकीट कापलं होतं.

बिहार, मध्यप्रदेशातील यशाचं बक्षीस

विधानसभेच तिकीट कापल्यानंतरही त्यांनी संयम कायम ठेवला 2019 पासून भाजपा संघटनेत केंद्रीय पातळीवरती सक्रिय झाले अनेक राज्यांच्या विधानसभा प्रभारी पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली गेली गेल्या पाच वर्षात बिहार मध्यप्रदेश मध्ये प्रभारी म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news