मुंबई; पुढारी वृत्तसेवा : निवडणूक प्रचार कालावधी संपलेला असतानाही रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांचे समर्थक प्रचार करत होते. त्यांनी भ्रष्ट मार्गाचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी केली आहे. तसेच राणे यांच्यावर 5 वर्षे निवडणूक लढविण्यावर आणि मतदान करण्यावर बंदी घालावी, अशी मागणीही राऊत यांनी केली आहे. अॅड. असीम सरोदे, अॅड. किशोर वरक, अॅड. श्रीया आवले यांच्यामार्फत निवडणूक आयोगाला पाठवलेल्या नोटिसीत राऊत यांनी ही मागणी केली आहे.