Success Story: वय स्वप्नांच्या आड येत नाही...68 व्या वर्षीही बारावीत फर्स्ट क्लास

बारावीच्या परीक्षेत विक्रोळीतील आजींचे यश
Success Story
Success StoryPudhari
Published on
Updated on

मुलुंड: वयाच्या 68 व्या वर्षी विक्रोळीतील मंगला पोपट ठोके या 68 वर्षीय आजींनी बारावीची परीक्षा देत फर्स्ट क्लास ( 60 टक्के) मिळवला आहे. वय कधीही स्वप्नांच्या आड येऊ शकत नाही, हे या आजींनी आपल्या मेहनतीच्या जारोवर सिद्ध करून दाखवले आहे.

मंगला ठोके यांना आर्थिक अडचणींमुळे अर्धवट शिक्षण सोडावे लागले होते. त्यात लग्न लवकर झाल्याने कौटुंबीक जबाबदाऱ्या आल्या. त्यानंतर पाच मुलींचे संगोपन करून त्यांना मोठे करेपर्यंत त्यांनी वायाची साठी ओलांडली. पण शिक्षणाची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्याचे उमेद त्यांच्या मनात होती.

Success Story
Dialysis Services Growth: डायलिसिस सेवेत झपाट्याने वाढ; 412 मशिन्सद्वारे उपचार

पतीच्या निधनानंतर त्यांना एकटेपणा जाणवू लागल्यानंतर यांनी शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. वर्ष 2023 मध्ये विक्रोळीतील शारदा नाइट हायस्कूल आणि जूनियर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांचा रोजचा कार्यक्रम खूप कष्टमय असायचा. सकाळी लवकर उठून घरातील सर्व काम उरकून त्या अभ्यास करीत संध्याकाळी त्या नाईट कॉलेजला जात असत.

वर्गातील 17 ते 18 वर्षे वयोगटाचे विद्यार्थी त्यांचा आदर करत असत. अभ्यासात मदत करत. शिक्षकही त्यांना नेहमी प्रोत्साहन देत असत. जिद्द आणि शिक्षणाची चिकाटी त्यांच्याकडे होती. या जारोवर त्यांनी या वर्षी बारावी परीक्षा दिली आणि यात त्यांना घवघवीत यश मिळाले आहे.

Success Story
Shalarth ID Issue: वेतनाअभावी शिक्षकांची आर्थिक कोंडी; शालार्थ आयडीसाठी शिक्षक सेना आक्रमक

आजींचा सल्ला

मंगलाजी आपल्या यशाचे श्रेय कठोर परिश्रम आणि श्रद्धेला देतात. त्या म्हणतात की, जर एखादी व्यक्ती दृढनिश्चयी असेल, तर ती काहीही साध्य करू शकते. त्यांच्या मते, आयुष्यात दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत: पहिली, प्रयत्न आणि दुसरी, देवावरील श्रद्धा. त्यांनी कधीही हार मानली नाही. म्हणूनच त्यांनी आपले दीर्घकाळापासूनचे स्वप्न साकार केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news