Vikhroli Railway Station Incident: तरुणाने घेतली धावत्या लोकलसमोर उडी; मित्राच्या तत्परतेमुळे वाचले प्राण

विक्रोळी स्थानकावर अंगावर काटा आणणारा थरार
Vikhroli Railway Station Incident
Vikhroli Railway Station IncidentPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: विक्रोळी रेल्वे स्थानकातील रेल्वेरूळावर धावत्या लोकल ट्रेनसमोर उडी घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचा, त्याच्याच मित्राने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जीव वाचवला.

अंगावर थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हा थरार सुरू असताना घटनास्थळी पोहोचलेल्या रेल्वे पोलिसांकडूनही या तरुणाची समजूत काढली जात होती. मात्र, तो तरुण नैराश्यात किंवा मानसिक तणावात असल्यामुळे कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.

Vikhroli Railway Station Incident
Harry Boxer: लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हस्तक हॅरी बॉक्सर अमेरिकेत जेरबंद! रोहित शेट्टी यांच्या घरावरील गोळीबाराची स्वीकारली होती जबाबदारी

कुर्ला रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रोळी रेल्वे स्थानकातील रेल्वेरूळावर शुक्रवारी सकाळी १० वाजता ही घटना घडली. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारा तरुण विक्रोळी स्थानकाजवळ अचानक धावत्या लोकलसमोर जीव देण्याचा प्रयत्न करत होता.

त्याचवेळी त्याच्यासोबत असलेल्या एका मित्राने कमालीचे प्रसंगावधान दाखवत त्याला बाजूला खेचले आणि मृत्यूच्या दारातून बाहेर काढले. मित्राने त्याला घट्ट पकडून ठेवत त्याचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तो तरुण पुन्हा धावत्या रेल्वेखाली जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते.

Vikhroli Railway Station Incident
Diwali Muhurat Trading 2026: लक्ष्मीपूजनाला आज शेअर बाजारात मुहूर्त ट्रेडिंग; बीएसई-एनएसईचे विशेष सत्र

लोकलसमोर जीव देण्‍यास निघालेल्‍या तरुणाचे नाव मुकेश पांचाळ असे असून तो विक्रोळी परिसरात राहतो. त्याचे वडील रिक्षाचालक तर आई गृहिणी असल्याचे कळते. याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार किंवा गुन्हा दाखल झालेला नाही. या दोन्ही तरुणांचा शोध घेऊन त्यांचे योग्य ते समुपदेशन केले जाईल, अशी माहिती कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण पडवी यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.