Women Cyber Crime : महिलांच्या सायबर छळावर तातडीने कारवाई करा

डीपफेक, मॉर्फ फोटोप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचे मुंबई पोलिसांना निर्देश
Women Cyber Crime
Women Cyber Crimepudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : महिलांचे डीपफेक व्हिडीओ, मॉर्फ केलेले फोटो, आक्षेपार्ह पोस्ट आणि सोशल मीडियावरील बदनामीकारक मजकुराच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मुंबई पोलिसांना दिले.

महिलांविरोधातील सायबर गुन्ह्यांमध्ये कोणतीही हयगय करू नये, अशी स्पष्ट सूचना त्यांनी केली. रहाटकर यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महिलांच्या सुरक्षेशी संबंधित विविध मुद्द्यांचा सोमवारी आढावा घेतला.

Women Cyber Crime
Pradeep Purnekar Case : आरोपी पप्प्या शिंदेच्या पोलीस कोठडीत वाढ

सायबर तक्रारींवर तातडीने पावले

सोशल मीडियावर महिलांचे फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने वापरणे, त्यात फेरफार करणे किंवा आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्याच्या घटना वाढत आहेत. अशा प्रकरणांमध्ये प्रत्येक तक्रारीचे स्वरूप आणि परिस्थिती तपासून त्वरित पोलिस कारवाई होणे आवश्यक आहे, असे रहाटकर यांनी सांगितले.

मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात विमेन हेल्प डेस्क उपलब्ध आहे का, तो प्रभावीपणे काम करतो का, तसेच महिला हेल्पलाइनवर तक्रार आल्यानंतर पोलिस किती वेळेत मदतीसाठी पोहोचतात, याची माहिती आयोगाने घेतली. महिला संकटात असताना पोलिसांची यंत्रणा त्यांच्यापर्यंत किती वेगाने पोहोचते, याचे नियमित निरीक्षण करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.

Women Cyber Crime
Navi Mumbai Airport Connectivity : सिंधुदुर्ग, गोवा आता नवी मुंबईच्या आकाशमार्गावर

मुंबई पोलिसांकडे मोठ्या प्रमाणावर कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी येतात. या तक्रारींवर वेळीच कारवाई झाल्यास कुटुंबातील परिस्थिती सुधारण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे पोलिसांनी अशा प्रकरणांमध्ये संवेदनशीलतेने आणि समन्वयाने काम करावे, असे रहाटकर यांनी सांगितले.

प्रशिक्षण घेणार

महिलांशी संबंधित तक्रारी हाताळताना पोलिसांमध्ये अधिक संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग आणि मुंबई पोलीस संयुक्तपणे प्रशिक्षण कार्यक्रम घेणार आहेत, असे रहाटकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news