

मुंबई : मंगळवारपासून मुंबई परिसरात पावसाचा जोर ओसरला, मात्र मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी एक असलेला नॅशनल पार्कातील विहार तलाव मंगळवारी रात्री नऊ वाजता ओसंडून वाहू लागला.
२७,६९८ दशलक्ष लीटर पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या विहार तलावातून मुंबई शहराला दररोज सरासरी २० दशलक्ष लिटर (९ कोटी लिटर) एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. १८५९ मध्ये ६५ लाख रुपये खर्चुन बांधण्यात आलेला विहार तलाव मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी एक आहे.
गेल्यावर्षी १८ ऑगस्ट २०२५ रोजी तो पूर्ण भरुन वाहू लागला होता. २०२४ मध्ये २५ जुलै व २०२३ मध्ये २६ जुलैमध्ये ओसंडून वाहू लागला होता. यंदा मात्र तो अंमळ लवकरच भरला आहे.