Vidhan Parishad Election 2026 | भाजपच्या विधानपरिषद उमेदवारांची यादी आज किंवा उद्या! 

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासोबत चर्चा 
Vidhan Parishad Election
Vidhan Parishad Election
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवार निश्चितीच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण शनिवारी दिल्लीत दाखल झाले होते. त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली. या भेटीत भाजपच्या वाट्याला आलेल्या जागांसाठीच्या संभाव्य उमेदवारांच्या नावांवर अंतिम चर्चा झाल्याचे समजते. या भेटीनंतर भाजप उमेदवारांची यादी 3 ऑक्टोबर 2026 शनिवारी रात्री उशिरा किंवा रविवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र भाजपने प्रत्येक मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांची यादी वरिष्ठांना दिली आहे. या सर्व उमेदवारांपैकी प्रत्येक ठिकाणी पक्षाची निवडणूक समिती निर्णय घेऊन उमेदवार देणार असल्याचे समजते. विशेष म्हणजे पाच मतदारसंघांपैकी भाजपकडे सर्व ठिकाणी उमेदवारांची तयारी आहे त्यामुळे पाच पैकी किती मतदारसंघांमध्ये भाजप अधिकृतपणे उमेदवार देणार याबद्दलचा निर्णय देखील शनिवारी रात्री किंवा रविवारी जाहीर होऊ शकतो. 

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ६ ऑक्टोबर असल्याने पक्षांकडे उमेदवार निश्चित करण्यासाठी आता मोजकेच दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवार निवडीची प्रक्रिया वेगाने पुढे नेली आहे. भाजपच्या वाट्याला तीन जागा येणार असल्याची माहिती यापूर्वी समोर आली आहे. राष्ट्रीय स्तरावर उमेदवारांच्या नावांवर अंतिम निर्णय झाल्यानंतर भाजपकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news