Navi Mumbai Fire Case| मध्यरात्री आगीचा तांडव! वाशीतील रहेजा रेसिडन्सी सोसायटीत भीषण दुर्घटनेत चौघांचा मृत्यू

Navi Mumbai Fire| नवी मुंबईतील वाशी परिसरामध्ये मध्यरात्री एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे.
Navi Mumbai Fire Case
Navi Mumbai Fire CaseAI Image
Published on
Updated on

Navi Mumbai Fire Case

नवी मुंबईतील वाशी परिसरामध्ये मध्यरात्री एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. वाशीतील सेक्टर 14 एम. जी. कॉम्प्लेक्समधील रहेजा रेसिडन्सी सोसायटीमध्ये लागलेल्या भीषण आगीत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही आग सोसायटीच्या 10, 11 आणि 12 व्या मजल्यावर पसरली होती, ज्यामुळे मोठे नुकसान झाले. आग इतक्या मोठ्या प्रमाणात होती की, चार जणांना आपला जीव गमवावा लागला.

Navi Mumbai Fire Case
Dry fruit fraud : एपीएमसी मार्केटमध्ये भेसळयुक्त सुकामेवा!

एकाच कुटुंबातील तिघांचा अंत

या दुर्घटनेत ज्या चौघांचा मृत्यू झाला, त्यात एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. दहाव्या मजल्यावरील एका घरात राहणाऱ्या एका वृद्ध आजीचा या आगीत मृत्यू झाला. बाराव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये राहणाऱ्या एका आई, वडील आणि त्यांच्या 6 वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा आगीत गुदमरून किंवा भाजून मृत्यू झाला. मृतांमध्ये पूजा राजन 40, सुंदर बाळकृष्ण 42 आणि वेदिका 6 या सहा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा अशा प्रकारे अकाली मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

आग मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. विशेषतः उंच इमारतींमध्ये (High Rise Building) धुरामुळे गुदमरून (Asphyxiation) मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त असते.

Navi Mumbai Fire Case
Omkar Elephant Sindhudurg | सिंधुदुर्गात 'ओंकार' हत्तीचा पुन्हा धुमाकूळ! घराशेजारी उभी मोटारसायकल चिरडली, व्हिडिओ व्हायरल

आगीवर नियंत्रण

मध्यरात्री लागलेल्या या आगीची माहिती मिळताच वाशी अग्निशमन विभागाने (Vashi Fire Brigade) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.

या दुर्घटनेमुळे संपूर्ण नवी मुंबई हादरली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, शॉर्ट सर्किटमुळे की अन्य कोणत्या कारणामुळे, याबाबत वाशी पोलीस आणि अग्निशमन दलाकडून कसून तपास सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टीने इमारतीच्या फायर ऑडिटचा मुद्दाही यानिमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news