Vashi Crime News: वाशीतील मिनी सी-शोर परिसरात १९ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

चायनीज हॉटेल कर्मचाऱ्यांवर अनेकांनी हल्ला केल्याचा संशय
Crime
Crimefile photo
Published on
Updated on

कोपरखैरणे: वाशीतील मिनी सी शोर परिसरात एका युवकाची निर्घृणपणे हत्या केल्याची माहिती पहाटे पाचच्या सुमारास पोलिसांना मिळाली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीसाठी वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात पाठविला आहे. सुजलकुमार महातो असे मृत तरुणाचे नाव असून, तो कोपरखैरणे येथील एका चायनीज हॉटेलमध्ये काम करत होता.

पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास अज्ञात आरोपीने सुजलकुमारच्या डोक्यावर धारदार हत्याराने जीवघेणे वार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. हत्या निर्घृण पणे केल्याचे प्राथमिक तपासात दिसून आल्याने आरोपी एकापेक्षा अधिक असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Crime
Nepal Flood Rescue: ४०४ यात्रेकरू सुरक्षित,३३८ संपर्कात; सुदैवानेच वाचले ते घरी परतू लागले

घटनेची माहिती मिळताच वाशी पोलीस, स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चंदेकर, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जहांगीर मुलाणी आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली होती. पोलिसांकडून घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यात येत असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

Crime
Political News: आमच्या मंत्र्यांचे निर्णय फिरविले जातात; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अमित शहा यांच्याकडे तक्रार

कोयता गँगची शक्यता?

दरम्यान, धारदार हत्याराने झालेल्या या हत्येमुळे नवी मुंबईत ‘कोयता गँग’चा वावर आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे. मात्र, या प्रकरणात कोणत्याही संघटित टोळीचा सहभाग असल्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news