मातोश्रीच्या अंगणात 'वसंत' फुलला : वसंत मोरेंच्या हाती ठाकरेंचे शिवबंधन

९ जुलैला समर्थकांसह करणार शिवसेनेत प्रवेश
Vasant More has met Uddhav Thackeray
वसंत मोरे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली आहे. ९ जुलै रोजी ते हाती शिवबंधन बांधणार आहेत. मनसेच्या स्थापनेपासून कार्यरत असणारे आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले वसंत मोरे यांनी मनसेचा राजीनामा देऊन वंचित आघाडीतून लोकसभा निवडणूक लढविली होती.

वसंत मोरे पुणे महापालिकेत तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी मनसेचा राजीनामा दिला होता. त्यांना वंचित बहुजन आघाडीने पुण्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. मात्र त्यांचा पराभव झाला. आज त्यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. ९ जुलैला ते ठाकरे गटात कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार आहेत. त्यांना अगामी विधानसभा निवडणुकीत हडपसर किंवा खडकवासला या मतदारसंघातून आमदारकीचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

Vasant More has met Uddhav Thackeray
अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा कालावधी कमी करणार

वंचितमध्ये गेलो पण मतदारांनी स्विकारलं नाही

९ तारखेला मातोश्रीवर समर्थकांसह प्रवेश करणार आहे. आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून त्यांच्यासोबत प्राथमिक चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीमध्ये गेलो होतो. पण मतदारांनी स्विकारलं नाही. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे वसंत मोरे यांनी ठाकरे यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

मनसेतून लोकसभा निवडणूक लढविण्याची होती इच्छा

मनसेच्या स्थापनेपासून वसंत मोरे राज ठाकरे यांच्यासोबत होते. मनसेतून लोकसभा निवडणूक लढविण्याची जाहीर इच्छा त्यांनी बोलून दाखविली होती. त्यासंदर्भात त्यांनी महाविकास आघाडीतील शरद पवार, संजय राऊत यांच्या भेटी घेतल्या होत्या. महाविकास आघाडीत पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडे होती. महाविकास आघाडीची उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मोरे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. नंतर वंचित बहुजन आघाडीतून त्यांनी पुणे लोकसभा लढविली, मात्र त्यांचा पराभव झाला. त्यांना ३२०१२ मते मिळाली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news