वसंत मोरे ठाकरेंच्या शिवसेनेत दाखल

मोतोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
Vasant More
वसंत मोरे ठाकरेंच्या शिवसेनेत दाखलfile photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्याचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी आज (दि. ९) मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पूर्वीपेक्षा अनेक पटीने पुण्यात शिवसेना वाढवा, असे आवाहन शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना केले.

काल पाऊस झाला आणि आज वसंत बहरला

काल भरपूर पाऊस झाला आणि आज वसंत बहरलाय, असे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत वसंत मोरे यांच्या शिवसेना प्रवेशावेळी म्हणाले. वसंत मोरे मुळचे शिवसैनिकच आहेत. त्यांच्यामुळे पुण्यात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. मजबूत शिवसैनिक आम्हाला मिळाला, असेही राऊत म्हणाले.

वसंत मोरे पुणे महापालिकेत तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी मनसेचा राजीनामा दिला होता. त्यांना वंचित बहुजन आघाडीने पुण्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. मात्र त्यांचा पराभव झाला. काही दिवसांपूर्वी त्यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना अगामी विधानसभा निवडणुकीत हडपसर किंवा खडकवासला या मतदारसंघातून आमदारकीचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

Vasant More
काँग्रेसची अतिरिक्त मते ठाकरेंच्या नार्वेकरांनाच

मनसेतून लोकसभा निवडणूक लढविण्याची होती इच्छा

मनसेच्या स्थापनेपासून वसंत मोरे राज ठाकरे यांच्यासोबत होते. मनसेतून लोकसभा निवडणूक लढविण्याची जाहीर इच्छा त्यांनी बोलून दाखविली होती. त्यासंदर्भात त्यांनी महाविकास आघाडीतील शरद पवार, संजय राऊत यांच्या भेटी घेतल्या होत्या. महाविकास आघाडीत पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडे होती. महाविकास आघाडीची उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मोरे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. नंतर वंचित बहुजन आघाडीतून त्यांनी पुणे लोकसभा लढविली, मात्र त्यांचा पराभव झाला. त्यांना ३२०१२ मते मिळाली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news