Varsha Ganesh Darshan: ‘वर्षा’वर बाप्पांच्या दर्शनासाठी परदेशी पाहुणे! २५ हून अधिक देशांच्या राजनैतिक प्रतिनिधींची उपस्थिती

मुंबईतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी विविध देशांचे महावाणिज्यदूत आणि वरिष्ठ राजनैतिक प्रतिनिधी गणेश दर्शनासाठी उपस्थित राहिले. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनीही बाप्पांचे दर्शन घेतले.
Varsha Ganesh Darshan
Varsha Ganesh DarshanPudhari
Published on
Updated on

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी विविध देशांच्या महावाणिज्यदूतांनी शुक्रवारी दाखल होत बाप्पांचे दर्शन घेतले. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनीही श्री गणेशाचे दर्शन घेतले.

महावाणिज्य दूतांमध्ये जपान येथील हितोमी सातो, व्हिएतनामचे ले क्वांग बिएन, दक्षिण कोरियाचे डोंगवान यू, यूएइचे अब्दुल्ला हुसेन अलमर्झुकी, ओमान देशाचे महबूब अल रईसी, इटलीच्या वॉल्टर फेरारा, तुर्कीयेचे मुस्तफा केमालेत्तिन एरुयगुर, येमेन देशाचे मोहम्मद ताहेर अब्दुलमोघ्नी, कतारच्या अहमद साद अल-सुलैती, थायलंडचे सिरीपोर्न सुपानी मत्विसेटकुल, फ्रान्सचे पॅट्रिक लेव्हेरीनो, पोलंड देशाचे तोमाश व्हिएल्गोमास, जर्मनीच्या ख्रिस्टॉफ हॅलियर.

Varsha Ganesh Darshan
IIT Bombay Student: परीक्षेत मोबाईल अन्‌ चॅट जीपीटी वापरताना पकडल्याने मुंबई आयआयटीत विद्यार्थ्याने उचलले टोकाचं पाऊल?

युक्रेनचे मिस ॲना झायचेन्को, आयर्लंड देशाचे पैट्रिक डफी, ब्राझीलचे रेल्सा पेलुती अलेंकार, इजिप्त देशाचे डालिया तवाकोल, चीन देशाच्या चिन जी, नेदरलँडचे नाबिल ताउती, इराणचे सईद रझा मोसायेब मोत्लाघ, स्वीडनचे स्वेन ऑस्टबर्ग, नॉर्वे येथील मॉनिका नागेलगार्ड, श्रीलंकेच्या शिरानी अरियाराथ्ने, मलेशियाच्या नजवा मुस्यरीफाह रामली, इराकचे जुहैर साद अब्बास, बेल्जियमचे पियरे स्टीव्हर्लिंक यांचा समावेश होता.

बांगला देशाच्या उपउच्चायुक्त फरहाना अहमद चौधरी, ब्रिटनच्या उप उच्चायुक्त कमलजीत कांग यांच्यासह अमेरिकेच्या उप महावाणिज्यदूत एरिन युसेन यांची उपस्थिती होती. तसेच फिनलंड येथील उप महावाणिज्यदूत जोन्ना सुनि उपस्थित होते.

Varsha Ganesh Darshan
Anant Chaturdashi Special Local|गणेशभक्तांसाठी गुड न्यूज! अनंत चतुर्दशीच्या रात्री १२ विशेष लोकल; चर्चगेट-विरार प्रवास सोपा

याप्रसंगी मुख्य राज्य शिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव श्रीकर परदेशी, अमृता फडणवीस आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news