Special Train: पश्चिम रेल्वेकडून वलसाड-वेलंकन्नी-डहाणू रोड विशेष रेल्वेगाडी

वसई रोड मार्गे ही सेवा देण्यात येणार आहे.
Special Train
Special Trainfile photo
Published on
Updated on

मुंबई: पश्चिम रेल्वेने वलसाड–वेलंकन्नी–डहाणू रोड दरम्यान विशेष भाडे आकारून विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही विशेष गाडी एकूण दोन फेऱ्या धावणार आहे. यात्रेकरू आणि सर्वसामान्य प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन ही विशेष सेवा सुरू करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.

वसई रोड मार्गे ही सेवा देण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०९०३० वलसाड–वेलंकन्नी विशेष ही शुक्रवार (३ जुलै) रोजी सायंकाळी ६.२५ वाजता वलसाड येथून सुटणार आहे. आणि रविवार (५ जुलै) रोजी सकाळी १० वाजता वेलंकन्नी येथे पोहोचेल.

Special Train
New School Syllabus Book: शालेय अभ्यासक्रमात थोर व्यक्तींवर नवे पुस्तक; शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती

परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०९०२९ वेलंकन्नी–डहाणू रोड विशेष ही सोमवार (६ जुलै) रोजी रात्री १२.३० वाजता वेलंकन्नी येथून सुटून मंगळवार (७ जुलै) रोजी सकाळी १०.३० वाजता डहाणू रोड येथे पोहोचेल.

ही विशेष रेल्वे दोन्ही दिशांना पालघर, वसई रोड, पनवेल, लोणावळा, पुणे, दौंड, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, यादगीर, कृष्णा, रायचूर, मंत्रालयम रोड, आदोनी, गुंतकल, गुत्ती, ताडीपत्री, येर्रगुंटला, कडपा, राजमपेट, रेणिगुंटा, काटपाडी, वेलूर कॅन्टोन्मेंट, तिरुवण्णामलाई, विलुप्पुरम, तिरुप्पादिरिप्पुलियूर, चिदंबरम, मायलाडुतुराई, तिरुवारूर, काराईकल, नागूर आणि नागपट्टणम या स्थानकांवर थांबणार आहे.

Special Train
Housing Sales Drop: महामुंबईत घरांची विक्री घटली; पुरवठा वाढला

गाडी क्र.०९०३० ला डहाणू रोड येथे अतिरिक्त थांबा देण्यात आला आहे. या विशेष रेल्वेगाडीत स्लीपर क्लास तसेच सामान्य द्वितीय श्रेणी (जनरल सेकंड क्लास) डबे असतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news