

मुंबई : जागतिक मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप (यूएमजी) आणि बॉलीवूडमधील प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊस एक्सेल एंटरटेन्मेंट यांच्यातील धोरणात्मक भागीदारीची घोषणा सोमवारी मुंबईत करण्यात आली.
या करारानुसार, यूएमजीची भारतीय शाखा युनिव्हर्सल म्युझिक इंडिया (यूएमआय) एक्सेल एंटरटेन्मेंटमध्ये 30 टक्के हिस्सा घेणार असून, कंपनीची एकूण किंमत 2 हजार 400 कोटी रुपये इतकी ठरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत याबाबत करार करण्यात आला. या करारामुळे भारताच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीला जागतिक स्तरावर नवे बळ मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले, युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप आणि एक्सेल एंटरटेन्मेंट यांच्यातील 2 हजार 400 कोटी रुपयांची धोरणात्मक भागीदारी ही केवळ एक व्यवहार नाही, तर भारत, महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबईवरील जागतिक कंपन्यांच्या विश्वासाचे प्रतीक आहे. ही भागीदारी क्रिएटिव्ह इकॉनॉमीच्या उज्ज्वल भविष्याचे प्रतिनिधित्व करते. भारताची क्रिएटिव्ह इकॉनॉमी आता पूर्णपणे प्रगल्भ झाली आहे, हे यावरून सिद्ध होते. मुंबई आता जागतिक मनोरंजन क्षेत्राचे नेतृत्व करण्यास सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई : युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप (यूएमजी) आणि बॉलीवूडमधील प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊस एक्सेल एंटरटेन्मेंट यांच्यातील धोरणात्मक भागीदारीची घोषणा सोमवारी मुंबईत करण्यात आली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुप्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर, अभिनेता फरहान अख्तर उपस्थित होते.