

Uddhav Thackeray | ‘आम्ही कोणाचे हिसकावून घेण्यासाठी युती केलेली नाही पण आमच्याच घरात येऊन आम्हाला धमकावणाऱ्यांचा आम्ही समाचार घेणारच, तुम्ही मोंदींचे बँडवाले आमचा ठाकरे ब्रँड संपवायला निघाला आहात ते तुम्हाला शक्य नाही. जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत तुम्हाला मुंबईचा घास घेऊ देणार नाही, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (दिं 11 रोजी)दिला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मनसे यांच्यावतीने आयोजित दादर येथील ‘शिवतीर्था’वरील संयुक्त सभेत ते बोलत होते.
आम्हाला ढोंगींवरती लाथ मारायला शिकवले
उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपाचा ठाकरी भाषेत चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले आम्ही आमच्या वडिलांकडून काय शिकला असा प्रश्न विचारला जातोय तर वडिलांनी आम्हाला ढोंगावरती लाथ मारायला शिकवले आहे. आणि भाजपच हिंदूत्व हे ढोंग आहे. ते निवडणूका आल्या की हिंदूत्वाचे ढोग घेतात. मराठी - अमराठी, हिंदू- मुस्लिम अशी भांडणे लावतात त्यामुळे त्यांचे हिंदूत्व ढोंगी आहे अशी टीका केली.
मराठी माणसांसाठी, हिंदूत्वासाठी एकत्र आलो
मराठीचे लचके तोडताना आम्ही काय घरी बसू का असा सवाल करत त्यांनी शिवसेना मनसे एकत्र आल्यावर भाष्य केले. आमच्यातील वाद आम्ही गाडून टाकले आहेत, मराठी माणसांसाठी, हिंदूत्वासाठी एकत्र आलो आहे असे स्पष्ट केले. निवडणूका आल्या की ‘भाजपडे’ रोंबा - सोंबा नावाचा विकृत डान्स करतात, लोकांना फोडणे, पक्ष फोडणे हिंदू - मुस्लिम, मराठी - अमराठी असा वाद सुरु करतात.
‘गोळीला तुम्ही पोळीला आम्ही’
मुंबईसाठी आम्ही जे केले आहे ते समोर मांडत आले. जनसंघ पूर्वी कदीही महाराष्ट्रात नव्हता पण संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आम्ही उभा केली. त्यामध्ये हे घुसले. मोरारजी देसाई मुख्यंमत्री असतान त्यांनी मराठी माणसांवर गोळया चालवल्या आणि आता हे भाजपावाले घरे पेटवून पोळी भाजनारे हे लोक पुढे आले आहेत. गोळया खाऊन मरणारी मराठी माणसे होती. त्यांच्या बलिदानामुळेच मुंबई उभी राहिली आहे. आता ‘गोळीला तुम्ही पोळीला आम्ही’ अशी भावना ठेवणारे भाजपावाले पुढे आले आहेत, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
मुंबईचे ‘बॉम्बे’ करण्याचा भाजपाचा डाव आहे
आमची मुंबईचे नाव मुंबादेवीवरुन ठेवले. पुर्वीचे इंग्रजांनी ठेवले बॉम्बे बदलून पण हे भाजपावाले महापालिका ताब्यात घेऊन तिचे नाव बॉम्बे करतील असा आरोप ठाकरे यांनी केला. शिवसेनेने मुंबईसाठी काय केले हे विचारतात कोण मिंदे फिंदे, या लोकांना शिवसेनेने मंत्री केले तेच उलटे झालेत पण मुंबई शहराचा विकास शिवसेने केला आहे. आता भाजपाच्या मनातले काळे, बाहेर पडले आहे भाजपावाल्यांना संविधान बदलायचे आहे कारण एक मराठी माणसाने ते लिहले आहे. त्यांना एका मराठी माणसाने लिहलेल्या संविधानावर देश चालतो याचे त्यांना वाईट वाटते. त्यासाठी त्यांना 400 वर लोकसभेत मताधिक्य हवे होते. आम्ही मुबई महापालिकेच्या 90 हजार कोटींच्या ठेवी केल्या होत्या. त्या गेल्या चार वर्षात यांनी तोडत आणल्या आहेत.
3 लाख कोटींचा घोटाळा सत्ताधाऱ्यांनी केला
पुढे त्यांनी राज्य सरकारवर टिका केलीसर्व मुंबई यांनी खोदून ठेवली, धूळ , प्रदूषणात मुंबई घुसमूटली आहे. आणि जी कामे सुरु आहेत त्यासाठी लागणारे सिंमेट अदानींच्या फॅक्टरीतून येते. या कामांमध्ये सत्ताधाऱ्यांनी 3 लाख कोटींचा केला आहे. मुंबई ताब्यात घेऊन ती यांना अदानींच्या घशात घालायची आहे. असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.