Raj Thackeray and Uddhav Thackeray
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आज ठाकरे बंधू एकत्र येऊन आपला संयुक्त 'वचननामा' जाहीर करणार आहेत. दुपारी एक वाजता शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा वचननामा प्रसिद्ध केला जाईल. विशेष म्हणजे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर शिवसेना भवनाची पायरी चढणार आहेत, जो शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांसाठी एक अत्यंत भावनिक क्षण मानला जात आहे.
दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते की या दोन्ही भावांनी एकत्र यावे, जे आता या युतीच्या निमित्ताने प्रत्यक्षात येताना दिसत आहे. या वचननाम्याची काही झलक अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या एका सादरीकरणातून आधीच पाहायला मिळाली आहे. आता आज ठाकरे बंधू मुंबईकरांना काय नवीन आश्वासने देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईकरांना देण्यात येणाऱ्या या आश्वासनांमध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
मराठी शाळा: मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळा वाचवणे आणि तेथे आधुनिक शिक्षण देणे.
पायाभूत सुविधा: रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या सोडवणे आणि सखल भागात साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा करणे.
आरोग्य व्यवस्था: मुंबईतील आरोग्य सुविधा अधिक कणखर आणि सक्षम करणे.
वाहतूक: बेस्ट बसचे दर आणि त्यातील सुविधांबाबत सुधारणा करणे.