Uddhav Thackeray on DJ Controversy| लोकांना उत्सव पाहिजे पण त्यातील जाच नको: उद्धव ठाकरे

सरकारने चर्चा करून मार्ग काढावा, अशी भूमिका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Pudhari
Published on
Updated on

मुंबई: उत्सवावामध्ये केवळ दणदणाट करण्यापेक्षा पारंपारिक वाद्ये वाजवून मिरवणुका होवू शकतात. लोक डीजे नको आहे. त्यामुळे लोक रस्त्यावर उतरले. त्यांना उत्सव पाहिजे आहे पण त्याच्यातून होणारा जाच नको आहे.

त्यामुळे सरकारने चर्चा करून मार्ग काढावा, अशी भूमिका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मांडली. पेपर फुटीला सरकार जबाबदार आहे. तरुणांच्या भविष्याशी सरकार खेळले आहे. सत्ताधाऱ्यांना सरकार चालवता येत नाही, अशी टीका त्यांनी केली.

Uddhav Thackeray
Jio World Plaza Security Breach: बनावट ओळखपत्र अन् बंदूक, जिओ वर्ल्डमध्ये घुसखोरी; दोघा जणांना अटक

आमच्या धनुष्यबाण चिन्हाचा मिंदे गटाने गैरवापर करून निवडणुका जिंकल्या. त्यामुळे निकाल येईपर्यंत चिन्हाचा गैरवापर रोखण्यासाठी आम्‍ही धनुष्यबाण चिन्ह गोठविण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news