Political News: एक तरुण मोदींना भिडतोय अन् तुम्ही पदांसाठी भांडताय? उद्धव ठाकरे संतप्त; नेत्यांना सुनावले खडे बोल

ठाणे जिल्ह्यातील पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि नवीन नियुक्त्यांबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.
Uddhav Thackeray
Uddhav ThackerayPudhari
Published on
Updated on

Uddhav Thackeray Matoshree Meeting

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच ‘मातोश्री’ निवासस्थानी ठाण्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे ठाकरे संतप्त झाले.

एक तरुण थेट मोदींना भिडतोय अन् तुम्ही पदांसाठी भांडताय, अशा शब्दांत त्यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. ठाणे जिल्ह्यातील पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी आणि नवीन नियुक्त्यांबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.

Uddhav Thackeray
Housing Scheme: २० टक्के गृहनिर्माण योजनेत विकासकांची लबाडी; बांधकाम क्षेत्रफळ अवाजवी वाढवल्याने अत्यल्प व अल्प गटाची घरे महाग

मात्र, या बैठकीत ठाणे आणि कल्याणमधील दोन गटांतील सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आला. स्वतःच्या डोळ्यांसमोर पदाधिकाऱ्यांची ही गटबाजी आणि राडा पाहून ठाकरे यांनी कडक शब्दांत पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांचे उदाहरण त्यांनी दिले.

Uddhav Thackeray
Disha Salian Case: दिशा सालियन प्रकरण पुन्हा चर्चेत; वडिलांनी संशय व्यक्त केला असताना पोलिसांनी गुन्हा का नोंदवला नाही? कोर्टाचा सवाल

दोन दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या काही महत्त्वाच्या आणि जुन्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली होती. या बैठकीत याच हकालपट्टीचा मुद्दा ऐरणीवर आला.

जुने पदाधिकारी आणि नव्याने नियुक्त होऊ पाहणारे पदाधिकारी यांच्यातील अंतर्गत मतभेद या बैठकीत उघडपणे बाहेर आले, ज्याचे रूपांतर तीव्र शाब्दिक बाचाबाचीत झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news