Mumbai : पक्ष फोडलात अन् आता पाठिंबा मागता?

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना सवाल
uddhav thackeray questions cm fadnavis
मुंबई : बी. सुदर्शन रेड्डी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना उद्धव ठाकरे. सोबत खा. संजय राऊत, आ. आदित्य ठाकरे, काँगे्रस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आ. जितेेंद्र आव्हाड. Pudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई : माझा पक्ष फोडला. नेते चोरले. आता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पाठिंबा का मागता, असा खरमरीत सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांनी शुक्रवारी ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे पाठिंबा देेण्याची मागणी केली. यावेळी ठाकरे यांनी रेड्डी यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला. ठाकरे म्हणाले, बी. सुदर्शन रेड्डी यांनी संविधानाच्या चौकटीत राहून काम केले आहे. संविधानाचे शपथ घेऊन न्याय बुद्धीने वागणारे उपराष्ट्रपती आपल्याला हवे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news