Maharashtra Legislative Council election: उद्धव ठाकरे अखेर परिषदेच्या रिंगणात; गुरुवारी अर्ज भरणार

गुरुवार, ३० एप्रिल रोजी ते आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार असल्याचे समजते.
Maharashtra Legislative Council election
Maharashtra Legislative Council electionPudhari
Published on
Updated on

मुंबई: विधान परिषदेच्या ९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरुकेली असतानाच महाविकास आघाडीच्या एका जागेवर शिवसेनेचे(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे विधान परिषदेची निवडणूक लढवण्यास तयार झाले आहेत. गुरुवार, ३० एप्रिल रोजी ते आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार असल्याचे समजते.

विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या १२ मे रोजी मतदान होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ३० एप्रिल आहे. उद्धव ठाकरे हे आधी निवडणूक लढवण्यास इच्छुक नव्हते. ते त्यांच्याइतर नेत्यांना संधी देण्यास इच्छुक होते.

Maharashtra Legislative Council election
Marathi language rule: मराठी शिकण्यासाठी टॅक्सी चालकांना १५ ऑगस्टची मुदत? आजच्या परिवहन बैठकीत अंतिम निर्णय

त्यामध्ये अंबादास दानवे, सुषमा अंधारे,विनायक राऊत, वैभव नाईक, सूरजचव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांची नावेचर्चेत होती. मात्र उद्धव यांनी निवडणूक लढवावी म्हणून मविआच्या नेत्यांकडूनत्यांची मनधरणी सुरू होती.

ठाकरेंनी निवडणूक लढविल्यास आमचा पाठिंबा राहिल, अशी भूमिका काँग्रेस व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली होती.अर्थात उद्धव ठाकरे विधान परिषदेची निवडणूक लढवणार नसतील, तर ही एकजागा आम्हाला द्यावी, अशी काँग्रेसने मागणी केली होती. परिणामी, आता उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवण्यावर होकार दिला असल्याचे समजते.

Maharashtra Legislative Council election
Crime News: किरकोळ वादातून मित्राची दगडाने ठेचून हत्या! एकाला अटक, एकाचा शोध सुरू

• महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षमिळून विधान परिषदेची केवळ एकजागा निवडून येईल इतके संख्याबळ त्यांच्याकडे आहे. त्यात उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर,ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

• दुसरीकडे उमेदवारी अर्ज दाखलकरण्यासाठी अवघे तीन दिवस उरलेआहेत. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही.त्यामुळे दोन्ही बाजूच्या इच्छुकांची घालमेल वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news