Marathi language rule: मराठी शिकण्यासाठी टॅक्सी चालकांना १५ ऑगस्टची मुदत? आजच्या परिवहन बैठकीत अंतिम निर्णय

संघटनांचा दबाव झुगारून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक मराठी सक्तीवर ठाम
Pratap Sarnaik
Pratap SarnaikPudhari
Published on
Updated on

मुंबई : ओला, उबर, रॅपिडो आदी टॅक्सी चालकांनामराठी सक्ती करण्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकठाम असून ही सक्ती मागे घेण्यास त्यांनी स्पष्ट नकारदिला. मात्र मराठी शिकण्यासाठी या चालकांना १५ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याची तयारी सरनाईकयांनी दाखविली आहे.

मंगळवारी परिवहन आयुक्तालयात राज्यातील५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचीव्यापक बैठक होत आहे. या बैठकीत सविस्तर चर्चाकरून चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतदेण्यावर योग्य निर्णय घेतला जाईल, असेहीपरिवहनमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Pratap Sarnaik
Tadgola Fruit Sales: उन्हाळ्याच्या उकाड्यात ताडगोळ्यांचा गारवा

मंत्रालयातील आपल्या दालनात सोमवारीआयोजित बैठकीत परिवहनमंत्री सरनाईक यांनी स्पष्टसांगितले की, महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवण्याचाव्यवसाय करणाऱ्या प्रत्येक चालकाला 'व्यावहारिकमराठी' अवगत असणे आवश्यक आहे, यावर राज्यशासन ठाम आहे.

ज्यांना मराठी येत नाही अशाअमराठी चालकांना ती शिकवण्यासाठी रिक्षासंघटनांनी सकारात्मक सहकार्य करावे, असेआवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घेणार नाही.

Pratap Sarnaik
Crime News: किरकोळ वादातून मित्राची दगडाने ठेचून हत्या! एकाला अटक, एकाचा शोध सुरू

या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, कामगार नेते शशांक राव, संजय निरुपम, हजी अराफत शेख तसेच विविध रिक्षा व टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. फक्त ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे बंधन का? अन्य प्रवासी वाहन चालकांना सूट असताना वर्षांवर्ष ऑटोरिक्षा चालवणाऱ्या चालकांवरच सक्ती कशासाठी करता? असा सवाल या बैठकीत रिक्षा व टॅक्सी संघटनांनी केला.

यावर सरनाईक म्हणाले, रिक्षाचालकांसाठी मराठी भाषेच्या व्यवहारिक ज्ञानासंदर्भात लघु अभ्यासक्रम तयार करण्याचा शासनाचा मानस आहे. राज्यभाषा म्हणून मराठीला सन्मान मिळावा, यासाठी अमराठी चालकांनी ती शिकणे आवश्यक आहे. ओला, उबर, रॅपिडो चालकांनाही मराठी बोलणे सक्तीचे केले जाईल. त्यांचा वाहन चालवण्याचा परवाना तपासला जाईल, असे सरनाईकांनी ठासून सांगितले.

अमराठी चालकांना मराठीशिकण्यासाठी ठरावीक मुदत द्यावी,ही संघटनांची मागणी योग्य आहे.त्यावर सकारात्मक विचार सुरू आहे.मात्र मराठी भाषा शिकणारच नाहीअशी मुजोरी दाखवणाऱ्यांवर कठोरकारवाई केली जाईल.

-प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news