

पुढारी ऑनलाईन डेस्क: एका कौटुंबिक कार्यक्रमात दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र दिसले आहेत. निमित्त होतं नातेवाईकांतील विवाहसोहळा. या दोघांनी सहकुटुंबिय या विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली होती. राज ठाकरे यांच्या भाच्याच्या लग्नात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही एकत्र दिसले आहेत, असे वृत्त 'पुढारी न्यूज'ने दिले आहे.
कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त आज (दि.२२) मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. मनसे नेते राज ठाकरे यांच्या भाच्याचा दादरमधील राजे शिवाजी महाविद्यालयात विवाहसोहळा संपन्न होत आहे. लग्नाला राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित आहेत. तसच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही सहकुटुंब उपस्थित राहिले आहेत. बऱ्याच दिवसांनंतर कौंटुंबिक सोहळ्यानिमित्त अमित ठाकरे, आदित्य ठाकरेंसह सहपरिवार एकत्र आला आहे, त्यामुळे कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त ठाकरे बंधूंचे राजकीय मिलन होणार का? या चर्चेंला उधाण आले आहे.
यापूर्वी देखील राज आणि उद्धव ठाकरे एका कौटुंबिक कार्यक्रमातच एकत्र दिसले होते. उद्धव ठाकरेंच्या मेहुण्याच्या मुलाच्या लग्नाला राज ठाकरे यांनी आवर्जुन हजेरी लावली होती. या कौटुंबिक भेटीनंतर राजकारणाची सूत्र पालटणार का, असाही प्रश्नही राजकीय वर्तुळात निर्माण केला जात आहे.