

Mumbai Traffic Police News |
मुंबई : सोमाणी जंक्शन येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिस कॉन्स्टेबल भिकाजी गोसावी यांनी आपल्या शौर्याचे दर्शन घडवत एका अनोळखी महिलेला मृत्यूच्या दारातून खेचून आणले. एका महिलेने समुद्रात उडी घेतली. ही घटना पाहताच गोसावी यांनी एक क्षणही न दवडता स्वतः समुद्रात उडी मारून महिलेचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.
मुंबई पोलिस कॉन्स्टेबल भिकाजी गोसावी सोमाणी जंक्शन येथे कर्तव्यावर होते. त्यांना एक महिला समुद्रात उडी मारताना दिसली. त्यांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली आणि वेळ वाया न घालवता समुद्रात उडी मारली आणि त्या महिलेला वाचवले. समुद्रात उडी मारल्याने महिलेची तब्बेत बिघडली होती. त्यामुळे तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.