Tipu Sultan Road Mumbai: मुंबईतील ‘टिपू सुलतान’ नावाचे दोन रस्ते पुन्हा चर्चेत

गोवंडी व अंधेरीतील नामकरणाचा ठराव; बदलत्या राजकीय वातावरणात निर्णयावर उत्सुकता
Tipu Sultan Road Mumbai
Tipu Sultan Road MumbaiPudhari
Published on
Updated on

मुंबई : मालेगावच्या उपमहापौरांच्या केबिनमध्ये टिपू सुलतानचे छायाचित्र लागले आणि राज्यभर राजकीय गदारोळ उठला. या वादात उडी घेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची बरोबरी थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केल्याने हा वाद चिघळला. या गोंधळात आता मुंबई महानगरातील दोन रस्ते अचानक रडारवर आले आहेत. याचे कारण या दोन्ही रस्त्यांना टिपू सुलतानचेच नाव दिले गेले आहे.

Tipu Sultan Road Mumbai
MMRDA Budget 2026: एमएमआरडीएचा 48 हजार कोटींचा विक्रमी अर्थसंकल्प; तिसऱ्या मुंबईसाठी 4500 कोटींची मोठी तरतूद

पूर्व उपनगरांतील एम. पूर्व गोवंडी येथील बाजीप्रभू देशपांडे मार्गापासून सुरू होऊन रफीनगर नाल्यापर्यंत जाणाऱ्या शिवाजी नगर मार्ग क्र. 4 या रस्त्याला ‌‘शहीद टिपू सुलतान मार्ग‌’ असे नाव देण्याचा ठराव एम. पूर्व प्रभाग समितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे एकमेव नगरसेवक विठ्ठल खरटमोल यांनी 26 जुलै 2013 रोजी ठराव मांडला होता. हा प्रस्ताव पुढे 27 डिसेंबर 2013 रोजी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही बिनविरोध मंजूर झाला.

Tipu Sultan Road Mumbai
AI Living Lab Maharashtra: देशातील पहिली ‌‘एआय लिव्हिंग लॅब‌’ महाराष्ट्रात, जर्मनीचे सहकार्य

या प्रस्तावाचे सूचक होते यशोधर फणसे आणि अनुमोदन दिले होते तत्कालीन नगरसेवक अमित साटम यांनी ! त्यावेळी आजच्या महापौर आणि तत्कालीन नगरसेविका रितू तावडे यांच्यासह भाजपचे 21 सदस्य सभागृहात उपस्थित होते. यापैकी कुणीही टिपू सुलतानचे नाव देण्यास विरोध केल्याची नोंद कामकाजात नाही. मूळ प्रस्तावच भाजप नगरसेवकाने मांडलेला असल्याने तो बिनविरोध मंजूर झाला. त्यावर आवाज उठवला नव्हता.

Tipu Sultan Road Mumbai
Sunetra Pawar NCP: सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी; 26 फेब्रुवारीला होणार अधिकृत घोषणा

अंधेरी पश्चिमेकडील गिल्बर्ट हिलमार्गे सी. डी. बर्फीवाला मार्गाच्या नाक्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे ‌‘शेर-ए-म्हैसूर टिपू सुलतान मार्ग‌’ असे नामकरण करण्याचा ठराव 23 एप्रिल 2001 रोजी महापालिका सभागृहात मांडण्यात आला. या ठरावाचेही सूचक भाजपचे नगरसेवक विठ्ठल खरटमोल हेच होते, तर अनुमोदन काँग्रेस पक्षाचे मोहसीन हैदर यांनी दिले होते. त्यांच्या उपस्थितीत सदर नावाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता. त्यावेळीही भाजपाचे 21 नगरसेवक उपस्थित होते.

आता बदलत्या राजकीय-धार्मिक वातावरणात या दोन्ही रस्त्यांना दिलेले ‌‘शहीद टिपू सुलतान‌’ हे नाव आता सत्तारूढ भारतीय जनता पक्षाकडून रद्द केले जाणार का, याबद्दल कमालीची उत्सुकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news