Thane Ulhasnagar metro : उल्हासनगरपर्यंत मेट्रो विस्ताराचा मार्ग मोकळा

मेट्रो ५ च्या सुधारित संरेखनास केंद्राची मान्यता
Thane Ulhasnagar metro
Thane Ulhasnagar metropudhari photo
Published on
Updated on

मुंबई : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ मार्गिकेच्या सुधारित संरेखनास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गिकेचा विस्तार उल्हासनगरपर्यंत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मेट्रो ५ मार्गिकेचा पहिला टप्पा कापूरबावडी ते धामणकरनाका असा असून याचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. या वर्षाच्या अखेरीस हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. मेट्रो ५ मार्गिकेचा विस्तार आणि ५ अ मार्गिका यांच्या सविस्तर आराखड्याला राज्य शासनाची यापूर्वीच मान्यता मिळाली आहे.

Thane Ulhasnagar metro
CSMT Sawantwadi Express : गणपतीला कोकण गाठणे होणार सुखकर; सीएसएमटी-सावंतवाडी एक्स्प्रेसला आज हिरवा झेंडा

शासन निर्णयानुसार मेट्रो ५ मार्गिका एकूण ३४.२०५ किमीची असेल. कापूरबावडी ते धामणकर नाका असा ११.९ किमीचा पहिला टप्पा आहे. तेथून पुढे दुर्गाडी चौकपर्यंत १०.४७५ किमीचा दुसरा टप्पा असेल.

त्याचवेळेस दुर्गाडी-आधारवाडी-खडकपाडा-कल्याण असा तिसरा टप्पा असेल. कल्याणच्या भोईरवाडी येथून ५ अ मार्गिका सुरू होऊन ती उल्हासनगरपर्यंत जाईल. तिसरा टप्पा अधिक ५ अ मार्गिका यांची एकूण लांबी ११.८३ किमी असेल.

जुन्या आरेखनानुसार मूळ मार्गिकेचा खर्च ८ हजार ४१६ कोटी रुपये होता. नव्या आरेखनानुसार संपूर्ण मार्गिकेचा खर्च १८,१३०.५५ कोटी रुपयांवर गेला आहे. मेट्रो ५ आणि ५ अ च्या सविस्तर प्रकल्प आराखड्यास आता केंद्र शासनाचीही मान्यता मिळाली आहे.

Thane Ulhasnagar metro
Disha Salian death case : दिशा सालियन मृत्यू प्रकरण सीबीआयकडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news