Tehsil Office Certificate: शैक्षणिक दाखल्यांसाठी 15 ते 20 हजारांची वसुली? तहसील कार्यालयांवर आमदार अस्लम शेख यांचा गंभीर आरोप

दलाल-अधिकाऱ्यांच्या संगनमताने एका दिवसात मिळतात दाखले; सामान्य नागरिकांना मात्र महिन्यांची प्रतीक्षा
 अस्लम शेख
अस्लम शेख
Published on
Updated on

कांदिवली : राज्यातील तहसील कार्यालये दलाल व भ्रष्टाचाऱ्यांचा अड्डा बनली आहेत. तहसील कार्यालयांत उत्पन्नाचे दाखले, डोमिसाईल व अन्य शैक्षणिक दाखल्यांसाठी अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून दलाल विद्यार्थी व पालकांकडून 15 ते 20 हजार रुपये आकारत असल्याचा गंभीर आरोप आ.अस्लम शेख यांनी आज विधानसभेत केला.

तहसील कार्यालयांतील भ्रष्टाचाराचे विदारक वास्तव मांडताना आ. आस्लम शेख म्हणाले, उत्पन्न दाखल्यासाठी बऱ्याचदा एक महिन्याचा कालावधी लागतो. या दाखल्यासाठी प्राधिकृत अधिकारी नायब तहसीलदार आहेत व त्यांच्या कार्यालयाबाहेर दलालांचा सुळसुळाट असतेो.

 अस्लम शेख
Sion Railway Flyover Work: सायन रेल्वे उड्डाणपुलाचे काम पुन्हा लांबले; पूर्णत्वाची नवी मुदत 15 ऑगस्ट

ज्या दाखल्यांसाठी एक महिना, किंबहुना त्यापेक्षाही जास्त काळ सामान्य नागरिकांना वाट पाहावी लागते, तेच दाखले दलालांच्या माध्यमातून नायब तहसीलदारांच्या सहीने एका दिवसात कसे मिळतात?

आरटीई प्रवेशासाठी तातडीने उत्पन्नाचे दाखले मिळवून देण्यासाठी दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी आहेत. आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पालक पैसे भरतात. वैद्यकीय कारणांसाठी लागणाऱ्या दाखल्यांसाठीही महिनोनमहिने नागरिकांना ताटकळत राहावे लागते.

 अस्लम शेख
Mumbai Hawkers: मुंबईतील फेरीवाल्यांना तात्पुरत्या जागा देण्याचे संकेत; उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा

दलालांना एका दिवसात दाखले मिळतात, मात्र सामान्य नागरिकांच्या नशिबी फक्त प्रतीक्षाच, याला काय म्हणायचे? दलाल व तहसील कार्यालयातील अधिकारी, विशेषतः प्राधिकृत अधिकारी नायब तहसीलदार, यांचे काय साटेलोटे आहे? 2015 पासून महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू आहे. मात्र हा कायदा आजपर्यंत कागदावरच राहिल्याचे खेदाने म्हणावे लागते. हा कायदा अस्तित्वात असतानाही तहसील कार्यालये भ्रष्टाचाराचा अड्डा बनली आहेत.विविध शैक्षणिक दाखले विद्यार्थ्यांना 7 दिवसांतत देण्यात यावेत.याशिवाय वैद्यकीय कारणांसाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले 1 दिवसात देण्यात यावेत. तहसील परिसरात दलालांना मज्जाव करण्यात यावा, असेही ते यावेळी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news