Tata Mumbai Marathon Expo 2026 : मंजुरीपूर्वीच मॅरेथॉन एक्स्पोचे साहित्य मुंबई विद्यापीठात

विद्यापीठ प्रशासन राजकीय दबावाखाली? युवासेनेचा आरोप
Tata Mumbai Marathon Expo 2026
मुंबई ः विद्यापीठाच्या कलिना संकुलात बुधवारी आणलेले साहित्य.pudhari photo
Published on
Updated on

मुंबई : टाटा मुंबई मॅरेथॉन एक्स्पो 2026 साठी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील तीन एकर जागा भाड्याने देण्याचा प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेसमोर मंजुरीसाठी येण्याआधीच संबंधित कंपनीने पूर्वतयारीचे साहित्य विद्यापीठ परिसरात आणून ठेवले. सदर बाब उघडकीस येताच युवासेना (उबाठा) संघटनेने तीव्र आक्षेप नोंदवला.

Tata Mumbai Marathon Expo 2026
Mumbai Kabutarkhana‌ : ‘गिरगावकर‌’शी वाद मिटवला

मुंबई विद्यापीठाची गुरुवारी होत असलेल्या व्यवस्थापन परिषद सभेत हा प्रस्ताव अधिकृत मंजुरीसाठी 8 व्या प्रस्तावानुसार मांडण्यात येणार होता. मात्र, त्याआधीच प्रोकम इंटरनॅशनल या कंपनीकडून बुधवारीच या संदर्भातील साहित्य आणून टाकण्यात आल्याने, राजकीय दबावाखाली विद्यापीठाचे प्रशासन चालवणार का? असा सवाल उपस्थित करत युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी कुलगुरू डॉ. प्रा. रविंद्र कुलकर्णी यांना निवेदन पाठवत विचारला आहे.

Tata Mumbai Marathon Expo 2026
Coaching Center Guidelines : खासगी कोचिंग वर्गांवर आता कडक निर्बंध

विद्यापीठाकडून ही प्रक्रिया नियमानुसारच करण्यात आली असून दबावाचा प्रश्न उद्बवत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news