

मुंबई : वर्ल्ड ॲथलेटिक्स गोल्ड लेबल रोड रेस असलेल्या टाटा मुंबई मॅरेथॉनच्या 21 व्या आवृत्तीत इथिओपियाच्या ताडू अबाते डेमे आणि येशी कलायू चेकोले यांनी लक्षणीय विजय नोंदवले. येशी चेकोलेसाठी हे तिच्या कारकिर्दीतील कोणत्याही मोठ्या मॅरेथॉनमधील पहिले विजेतेपद ठरले, जरी ती 2019 पासून या अंतरावर धावत होती.
या शर्यतीत सुमारे डझनभर इथिओपियन महिला धावपटूंनी एकत्र सुरुवात केली होती. येशीने तीन-चतुर्थांश अंतर कापले तेव्हा किडसन आणि इतर दोन सहकाऱ्यांसह (गोज्जाम तेस्गाये आणि बिर्के देबेले) आघाडीच्या गटात स्थान कायम ठेवले होते. तिने शेवटच्या काही किलोमीटरवर वेग वाढवला . 2.25.13 च्या वेळेसह तिने शर्यत जिंकली.=
सामन्यानंतर येशी म्हणाली, आज विजेती झाल्याचा मला खूप आनंद आहे. मी कोर्स रेकॉर्ड तोडण्याच्या अपेक्षेने आले होते, पण हवामानामुळे मी थोडी डगमगले. तरीही निकालाने मी खूप खूश आहे. चढ-उताराच्या भागांमध्येही मला स्वतःला मजबूत आणि सकारात्मक वाटले. किडसनने सांगितले की, शर्यतीच्या मार्गावर प्रेक्षकांकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे तिला प्रोत्साहन मिळाले.
पुरुष एलिट मॅरेथॉनमध्ये केनियन लिओनार्ड किप्रोटिच लंगाट, गेल्या वर्षीचा उपविजेता मेर्हावी केसेटे (इरिट्रिया) आणि ताडू अबाते (इथिओपिया) यांच्यात सुरुवातीपासूनच चुरस होती. युगांडाचा 2023 विश्व मॅरेथॉन चॅम्पियन व्हिक्टर किपलांगट आणि इथिओपियाचा गडा जेमसिसा हे अर्ध्या टप्प्यापर्यंत त्यांच्यासोबत होते. इथिओपियन धावपटूने 2.09.55 वेळेसह प्रथमच फिनिश लाईन ओलांडली. लंगाटने 15 सेकंदांनंतर दुसरे स्थान मिळवले. केसेटे 2.10.22 वेळेसह तिसऱ्या स्थानी राहिला. या विजयामुळे इथिओपियन खेळाडूंनी मुंबईत सातव्यांदा पुरुष आणि महिला दोन्ही विजेतेपद पटकावली आहेत.