

TATA Hospital Mumbai
मुंबई : कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाटा हॉस्पिटलमध्ये लवकरच अमेरिकेत वापरले जाणारे प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. याद्वारे सुरुवातीच्या टप्प्यातच कर्करोगाचे निदान करता येईल. सीएसआर अंतर्गत टीएमएचला ही आधुनिक तंत्रज्ञानाची डिजिटल अँजिओग्राफी सिस्टम (डीएसए) मिळणार आहे. टाटा रुग्णालयचा पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत करार (एमओयू) केला आहे.
भारतात, दर एक लाख लोकांपैकी सुमारे 100 जणांना कर्करोगाचे निदान होते. कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्रामच्या अहवालानुसार, 2020 च्या तुलनेत 2025 मध्ये कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये 12.8 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.ही वाढ चिंताजनक असून कर्करोग उपचार अधिक प्रभावी करण्यासाठी अचूक निदान, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सारख्या उपाययोजना वापर झाला पाहिजे. यासाठीच पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आशियातील आघाडीच्या कर्करोग उपचार आणि संशोधन संस्थांपैकी एक असलेल्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलला अत्याधुनिक डिजिटल सबट्रॅक्शन अँजिओग्राफी सिस्टम (ऊड-) देणगी म्हणून दिली आहे.
टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचारांच्या मोहिमेला मदत होत असल्याने आम्हाला अभिमान आहे. प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानाची उपलब्धता हा सर्व रुग्णांसाठी विशेषाधिकार नसून अधिकार असला पाहिजे असे पॉवर डीआयडी कॉर्पोरेशनचे जनरल मॅनेजर हरा प्रसाद पाल यांनी सांगितले.
डिजिटल सबट्रॅक्शन अँजिओग्राफी विथ कॉम्प्युटेड टोमोग्राफी (डीएसए) ही एक अत्याधुनिक इमेजिंग सिस्टीम आहे जी रक्तवाहिन्या आणि ट्यूमरच्या उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा योग्य वेळेमध्ये मिळते..कर्करोगाच्या उपचारांसाठी इंटरव्हेंशनल रेडिओलॉजीचा वापर वेगाने वाढत असल्याने, ही प्रगत प्रणाली या रुग्णांचे अचूक निदान आणि उपचार करण्यास मदत होणार आहे.
टाटा हॉस्पिटलच्या रेडिओ डायग्नोसिस विभागाचे प्रमुख डॉ. सुयश कुलकर्णी म्हणाले की, कर्करोगाचे निदान होण्यासाठी साधारणपणे एक ते दोन आठवडे लागतात. यामुळे कर्करोग लवकर ओळखण्यास आणि उपचार सुरू करण्यास मदत होईल. त्याच्या मदतीने अधिकाधिक रुग्णांवर उपचार करता येतील.
मूत्रपिंड, फुफ्फुस, स्तन, ट्यूमर, बालरोग कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी हे तंत्र खूप उपयुक्त ठरेल. डॉक्टर आणि तंत्रज्ञांना या तंत्राचे प्रशिक्षण दिले जाईल. टप्प्याटप्प्याने, कर्करोग निदानात या तंत्राचा वापर केला जाईल.